Jubin Nautiyal Secret Wedding In Uttarakhand: आपल्या शानदार आणि दमदार आवाजातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) सध्या त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यानं आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे.   द टाइम्स ऑफच्या रिपोर्ट्सनुसार, सिंगर (Singer Wedding) विवाहबंधनात अडकला आहे. त्यानं आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीसह लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याने अगदी गुपचूप पद्धतीने उत्तराखंडच्या डोंगराळ भागात खासगी समारंभाचे आयोजन करुन विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  गायकाच्या लग्नाची माहिती समोर येताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

जुबिन नौटियालने पारंपारिक पद्धतीने केलं लग्न (Jubin Nautiyal private wedding ceremony)

 जुबिन नौटियाल हा मुळचा देहारादून येथील रहिवासी आहे.  त्याचं पालन पोषण तिथेच झालं. गायक तिथेच वाढला. त्यानं आपल्या आयुष्यातील  खास दिवसाची अर्थात लग्न समारंभासाठी जागा उत्तराखंडची निवडली. रिपोर्ट्सनुसार, जुबिन नौटियालने अगदी पारंपारिक पद्धतीने विवाह केला होता. आपल्या पारंपारिक पद्धतीने लग्न केल्यामुळे त्याचं विशेष कौतुक होत आहे. 

या खास जोडप्याच्या लग्नातील सर्वे विधी अगदी खास पद्धतीने पार पडले.   एकीकडे सगळे सेलेब्स ग्रँड वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत, दुसरीकडे जुबिन नौटियालने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे.   दरम्यान, त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियात पसरताच चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गायकाचे चाहते आनंदित झाले आहेत.  

गायकाची पत्नी आहे तरी कोण? (Bollywood singer Jubin Nautiyal marriage)

आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे, गायकाची पत्नी नेमकी आहे तरी कोण? रिपोर्ट्सनुसार,  गायकाची पत्नी ही त्याची बालपणीची मैत्रिण आहे. अलिकडेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गायकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या इन्स्टाग्राम स्टोरीतून त्यानं आपल्या लेडी लव्हची झलक दाखवली होती.   तेव्हापासून चाहत्यांनी असा अंदाज बांधला होता की, जुबिन लवकरच विवाह बंधनात अडकेल, आणि त्याच्या चाहत्यांचा अंदाज खरा ठरला.  माहितीनुसार जुबिनने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले असून, त्याच्या लग्नात कुटुंब आणि जवळच्या लोकांचा  सहभाग होता.  TOIच्या रिपोर्ट्सनुसार, जुबिन नौटियालला आपली पर्सनल लाईफ प्रायव्हेट ठेवायला आवडते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'बिग बॉस मराठी'चा सीझन शेवटच्या टप्प्यात; घराबाहेर पडलेल्या स्पर्धकानं धाडली लीगल नोटीस, 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली