Jio Cinema Merging With Disney Plus Hotstar : सध्या ओटीटीचा काळ सुरू आहे. वेब सीरिजसोबतच  चित्रपट पाहण्यासाठीदेखील प्रेक्षक ओटीटीला प्राधान्य देत आहेत. काही चित्रपट हे थिएटरऐवजी थेट ओटीटीवर रिलीज झाले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्ससारख्या  ओटीटी प्लॅटफॉर्मचा चांगलाच द बदबा निर्माण झाला आहे. तर, मागील काही वर्षांपासून जिओ सिनेमाने आपलं वर्चस्व निर्माण केले आहे. 


Jio Cinema OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar मध्ये विलीन होणार असल्याचे वृत्त समोर आले. या विलीनीकरणामुळे जिओ सिनेमा एक मोठे युनिट तयार करणार असून त्याचा परिणाम ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे विलीनीकरण अद्याप झालेले नाही. पण याआधीही जिओ सिनेमाने ओटीटी उद्योगाला हादरा दिला आहे.


जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारच्या विलीनीकरणाने काय होणार?


जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारच्या विलीनीकरणाने भारतात एक सिंगल मजबूत स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म तयार होईल. या युनिटमध्ये 100 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि दोन मेन ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार असतील. या युनिटकडे रिलायन्स आणि Viacom18 च्या मालकीची क्रीडा कंटेट आणि Disney च्या कंटेंटचे भारतात वितरण करण्याचे अधिकार असतील.


जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीला कसे हादरवले?


जिओ सिनेमाने विलीनीकरणाआधीच ओटीटी उद्योगाला हादरवले आहे. Binz नुसार, विवेक श्रीवास्तव, OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओ इंडियाचे ग्रोथ आणि बिझनेस हेड, आता जिओ सिनेमा हिंदीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड म्हणून पदभार स्वीकारतील.


दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला भारी पडणार जिओ सिनेमा


अॅमेझॉन प्राईम व्हिडीओमध्ये जबाबदारी सांभाळलेल्या विवेक श्रीवास्तव हे आपला अनुभव आणि स्ट्रॅटेजीसह जिओ सिनेमामध्ये आपली नवी इनिंग सुरू करणार आहे.  त्यामुळे जिओ सिनेमा हा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मसमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.