Jaya Bachchan: जया बच्चन क्वचितच मुलाखती देतात, पण जेव्हा देतात तेव्हा त्यांच्या तिखट बोलण्याने चाहतेही थक्क होतात. तर अनेकदा पॅपाराझींवर खेकसतानाचे व्हिडीओ व्हायरल होताना चाहत्यांनी पहिले आहेत. नुकतीच Mojo Story ला दिलेली त्यांची ताजी मुलाखत चर्चेचा विषय झालीय. त्यांनी लग्न, नातेसंबंध आणि स्वतःच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बेधडक मत मांडत चाहत्यांनाही थक्क केलंय. लग्न ही संकल्पना 'जुनी' असल्याचंही त्यांनी म्हटलं तर त्यांची नात नव्या नवेली नंदा हिनं लग्न करुच नये, असं वाटत असल्याचंही सांगितलं. लग्नाबद्दल अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया काय असेल असे विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मी कधी त्यांना विचारलं नाही. ते कदाचित म्हणतील, ‘माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक होती’, पण मला ते ऐकायचं नाही!”
आम्ही काही वर्षे कायद्याने’ पती-पत्नी नव्हतो!
अभिनेत्री जया बच्चन म्हणाल्या, “नात्याचं वजन लग्नाच्या एका कागदावर अवलंबून नसतं. लग्नाचा लाडू खाल्लात तरी पश्चाताप नाही खाल्लात तरी पश्चाताप! आयुष्य जगण्यासाठी कागदावर सही करायची गरज नाही… आम्ही तर लग्नाच्या दिवशी रजिस्टरवर सहीसुद्धा केली नव्हती. नंतर कुणीतरी सांगितलं की सही करावी लागते, तेव्हाच केली. म्हणजे काही वर्षं आम्ही ‘कायद्याने’ पती-पत्नी नव्हतोही!” लग्नाबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न त्यांना विचारला त्यावरही जया बच्चन यांनी भन्नाट उत्तर दिलं.त्या म्हणाल्या, “मी कधी त्यांना विचारलं नाही. ते कदाचित म्हणतील, ‘माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक होती’, पण मला ते ऐकायचं नाही!”
''जुने घाव उकरून तुम्हाला काय करायचंय?''
जया बच्चन यांनी पहिल्या नजरेतलं प्रेम मान्य केलं. त्या म्हणाल्या, “मी त्यांच्यावर केव्हा प्रेम केलं, ते मला आठवत नाही… तुम्हाला जुने घाव उकरून काय करायचंय? गेले 52 वर्षं मी त्यांची पत्नी आहे. यापेक्षा जास्त प्रेम काय करणार? मी म्हणेन ‘लग्न करू नका’ जरा जुनाट विचार वाटतील पण सत्य हेच की ते पहिल्या नजरेतलं प्रेम होतं.” अमिताभ आणि जया बच्चन यांची प्रेमकहाणीही तितकीच सिनेमॅटिक आहे. ‘गुड्डी’च्या सेटवर भेट, ‘एक नज़र’च्या शूटिंगदरम्यान प्रेम, 1973 मध्ये लग्न आणि आज दोघं मिळून 52 वर्षांचं एकमेकांसोबत सहजीवन. त्यांची दोन मुलं अभिषेक आणि श्वेता आहेत.