पुणे : 'तुम्ही माझे ऐकाल तर मी तुमचे ऐकेन, ही माझी फक्त विनंती आहे, नाहीतर म्हणाल दादांनी धमकी दिली...' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. तुम्ही माझी विनंती ऐका, मी तुमची विनंती ऐकेन असंही अजित पवार म्हणाले. विकास हवा असेल तर राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं. अजित पवारांनी राजगुरूनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
माणुसकी म्हणून जगत असताना जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. हुतात्मा राजगुरू यांचं बलिदान भारतातील कोणीच विसरु शकत नाही. या विचारांवर आपण पुढं जातोय असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, "सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली केली तरच विकास होऊ शकतो. ती चांगली असेल तरच वाहतूक कोंडी सुटू शकते, नाहीतर ती सुटणारच नाही. आम्ही आता चाकणपर्यंत मेट्रो आणली, ती पुढे मी राजगुरुनगरपर्यंत नेऊ शकतो. हे फक्त 'मी करू शकतो' असं म्हटलं. माझं तुम्ही ऐकलं तर तुमचं मी ऐकेण. म्हणजे ही विनंती आहे. नाहीतर म्हणाल की दादांनी धमकी दिली म्हणून. मी आपली विनंती करतोय. तुम्ही माझी विनंती ऐका, मी तुमची विनंती ऐकेन."
Ajit Pawar Pune Speech : प्रशासन मला टरकून राहतं
अदित पवार पुढे म्हणाले की, "मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोक माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. पण मी एक रुपयांचा मिंधा नाही. तुम्ही दाखवून द्या की मी काम करताना कोणाकडून पैसे घेतले, किवा चिरीमिरी द्यावी लागली. उलट प्रशासन मला टरकून राहते.
अजित पवार यांनी राजगुरुनगरवासियांना अप्रत्यक्ष प्रलोभन दिल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, "येत्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. आता आचारसंहिता असल्यानं मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. मात्र या अधिवेशनात तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी किती निधी लागेल, त्यासाठी काय करावं लागेल, हे पाहतो. पण आचारसंहितेमध्ये मला यावर बोलता येणार नाही."
ही बातमी वाचा :