Jana Nayagan Box Office Collection Day 7: दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा (Thalapathy Vijay) बहुचर्चित 'जना नायकन' (Jana Nayagan) बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. पहिल्या विकेंडमध्ये जबरदस्त कमाई केल्यानंतर आता वीकडेजमध्ये चित्रपटाच्या कमाईचा वेग काहीसा मंदावला आहे.  तरीही हा चित्रपट अजूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. सहाव्या दिवशी कमाईत घसरण झाल्यानंतर सातव्या दिवशीचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.

Continues below advertisement

Sacnilk च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'जन नायकन'ने सातव्या दिवशी (Day 7)  भारतात चित्रपटाने सातव्या दिवशी केवळ 6.10 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. हा चित्रपट देशभरातील 5,362 शोमध्ये प्रदर्शित होत आहे. 

सहाव्या दिवशी कमाईत मोठी घसरण

चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 8 कोटी रुपयांची नेट कमाई केली. सोमवारी झालेल्या 10.65 कोटी रुपयांच्या कमाईच्या तुलनेत हा आकडा सुमारे 24.9 टक्क्यांनी कमी होता. आठवड्याच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून आलं. आतापर्यंत 'जना नायकन'ची भारतातील एकूण नेट कमाई 143.40 कोटी रुपये, तर ग्रॉस कलेक्शन 167.57 कोटी रुपये झाले आहे. जगभरातील चित्रपटाची एकूण कमाई 246.07 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Continues below advertisement

सहाव्या दिवशी ऑक्युपन्सी किती होती?

मंगळवारी चित्रपटाची एकूण ऑक्युपन्सी 25.73 टक्के नोंदवली गेली. यामध्ये सकाळच्या शोमध्ये 19.08 टक्के, दुपारच्या शोमध्ये 22.69 टक्के, संध्याकाळच्या शोमध्ये 31.15 टक्के, तर रात्रीच्या शोमध्ये 30 टक्के प्रेक्षक उपस्थित होते.

दिग्दर्शक काय म्हणाले?

चित्रपटाला मिळालेल्या मिश्र प्रतिक्रियांबाबत दिग्दर्शक एच. विनोथ यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, त्यांनी बहुतांश रिव्ह्यू वाचलेले नाहीत. आजच्या पीआर आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंगच्या काळात कोणता रिव्ह्यू खरा आणि कोणता प्रायोजित आहे, हे ओळखणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले 'प्रामाणिक अभिप्राय असेल तर तो नक्कीच स्वीकारू. 'जन नायकन' हा पूर्णपणे व्यावसायिक मनोरंजनपट असल्याची जाणीव पहिल्यापासूनच होती. त्यामुळे चित्रपटाचे मूल्यमापन त्या चौकटीतच व्हायला हवे, असेही त्यांनी म्हटलं.

चित्रपटात कोणकोणते कलाकार?

'जना नायकन'मध्ये विजयसोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, प्रियमणी, गौतम वासुदेव मेनन आणि प्रकाश राज यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या पुढील काही दिवसांतील कमाईकडे आता बॉक्स ऑफिसचे लक्ष लागले आहे.