IND vs PAK In Asia Cup 2025: आशिया कप 2025 मधील  सर्वात रोमांचक सामना टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं दमदार कामगिरी करत पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं. हा भारताचा सलग दुसरा विजय असून यामुळे टीम इंडिया सुपर-4 मध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पण, भारत पाकिस्तानच्या सामन्यात एक विचित्र घटना घडली. आधीच टीम इंडियामुळे शरमेनं पाकिस्तानची मान खाली झुकली होती. त्यातच आशिया कपच्या नियोजनात झालेल्या चुकीमुळे तर पाकिस्तानवर तोंड लपवण्याची नामुष्की ओढवली. 

Continues below advertisement

पहिल्यांदाच, टॉस दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलनही केलं नाही. दुसऱ्यांदा, जेव्हा राष्ट्रगीताची वेळ आली तेव्हा, पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी, स्टेडियममध्ये 'जलेबी बेबी' हे गाणं वाजलं. एकीकडे, पाकिस्तानी खेळाडू त्यांचं राष्ट्रगीताची वाट पाहत असताना, स्टेडियममध्ये डीजेवर 'जलेबी बेबी' हे गाणं वाजलं.

DJ नं वाजवलं 'Jalebi Baby' गाणं 

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये सामन्यापूर्वी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं. भारत-पाकिस्तान सामन्यातही राष्ट्रगीताची परंपरा सुरू होती आणि सर्वात आधी पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजवायचं होतं. पाकिस्तानी खेळाडू राष्ट्रगीतासाठी तयार असलेल्या सरळ रेषेत उभं होतं. त्यानंतर जेसन डेरुलो आणि टेशर यांचं 'जलेबी बेबी' गाणं वाजू लागलं आणि हे ऐकून पाकिस्तानी खेळाडू थक्क झाले.

हात हलले नाहीत किंवा डोळे मिचकावले नाहीत

आशिया कप असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा, सहसा दोन्ही संघांचे कर्णधार टॉस दरम्यान हस्तांदोलन करतात. पण जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव टॉससाठी आला, तेव्हा त्यानं पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाकडे पाहिलं नाही किंवा हस्तांदोलन केलं नाही. यावरून हे स्पष्ट होतं की, भारतीय संघ पाकिस्तानशी कोणताही संवाद साधू इच्छित नाही. सूर्यकुमार यादवच्या या वृत्तीनं संपूर्ण पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं आहे.