Colors Marathi: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jai Jai Swami Samarth) दर आठवड्याला भक्तिभाव, चमत्कार आणि जीवनाचे गूढ अर्थ उलगडत नेते. या आठवड्यात मालिकेच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे एक भावनिक आणि अध्यात्मिक सफर ‘सावित्रीचा अक्कलकोटचा प्रवास’. या विशेष भागात दाखवली जाणार आहे एका भक्त स्त्रीची अढळ श्रद्धा, तिचा संघर्ष आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा अद्भुत प्रत्यय.

Continues below advertisement

जिथे श्रद्धा असते तिथे परीक्षा येतेच!

या विशेष एपिसोडमध्ये केंद्रस्थानी आहे सावित्री .कर्जात बुडालेली पण स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धेने जगणारी स्त्री. गतिमंद गौतमसाठी ती आया असली तरी तिचं खरं जगणं आहे स्वामींसाठीची भक्ती. ती गोवऱ्या थापून, त्या विकून अक्कलकोटच्या दर्शनासाठी पैसे जमवते आणि आनंदाने म्हणते, “गोवऱ्या विकल्या... आता मी स्वामींना भेटायला जाणार!” पण जिथे श्रद्धा असते तिथे परीक्षा नक्की येतेच! सावित्रीच्या आयुष्यातही ही परीक्षा येते सावकार भानुदासच्या रूपात जो पैशाच्या अहंकारात बुडालेला आहे. तो तिच्या मेहनतीचे पैसे हिसकावून घेतो आणि म्हणतो, “माझं कर्ज फिटेपर्यंत हे पैसे माझेच!” या क्षणानंतर मालिकेत दिसतो भक्ती आणि अहंकाराचा संघर्ष.

प्रेक्षकांसाठी स्पिरिच्युअल सिनेमॅटिक ट्रीट

याचवेळी मालिकेत दाखवली जाते एक अप्रतिम लीला स्वामी समर्थ स्थानावर गोवरी हातातून सोडतात आणि ती घरंगळत जात असताना पुढे आगीची भिंत उभी राहते! स्वामींचा आवाज घुमतो, “माझ्या आदेशाशिवाय अक्कलकोटास कोणी पोहोचू शकत नाही, आणि माझा आदेश आला की कुणी अडवू शकत नाही.” हा संवाद ऐकून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येणार यात शंका नाही. या आठवड्यातील भागांमध्ये सावित्री आणि भानुदास यांच्यातील हा संघर्ष उत्कंठा निर्माण करणार आहे. एका बाजूला गर्व आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धा आणि दोघांच्या मध्ये प्रकट होणारी स्वामी समर्थांची कृपा, हा दृश्यानुभव प्रेक्षकांसाठी एक स्पिरिच्युअल सिनेमॅटिक ट्रीट ठरणार आहे.

Continues below advertisement

कलर्स मराठीवरची ही मालिका आधीच आपल्या कथानक आणि भावनिक सादरीकरणामुळे लोकप्रिय ठरली आहे. आता ‘सावित्रीचा अक्कलकोट प्रवास’ या विशेष भागामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाहा ‘जय जय स्वामी समर्थ, आदेश स्वामींचा योग्य अक्कलकोट दर्शनाचा’, सोम ते शनी, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर!