Jaat Movie Controversy Over Church Scene: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' सिनेमा (Jaat Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. सनी देओल, रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) स्टारर 'जाट' (Jaat) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण, आता 'जाट' चित्रपटाभोवती वादाचे काळे ढग जमा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातील एका दृश्यावरुन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'जाट'मध्ये एक चर्चचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. याच दृश्यावर ख्रिश्चन समुदायानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या सीनमुळे ख्रिश्नच समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचंही बोललं जात आहे.
'जाट' सिनेमात एक चर्चचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये रणदीप हुड्डा चर्चच्या आत, क्रॉसच्या अगदी खाली, व्यासपीठाजवळ (Pulpit) उभा असल्याचं दाखवलं आहे, तिथेच बाजूला जिथे ख्रिश्चन बांधव प्रार्थना करत असल्याचं दाखवलं आहे. त्यासोबतच चित्रपटात गुंडगिरी आणि धमकीची दृश्यही दाखवण्यात आली आहेत. ज्यामुळे ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.
ख्रिश्चन समुदायाचं नेमकं म्हणणं काय?
ख्रिश्चन समुदायाचं म्हणणं आहे की, हे दृश्य केवळ त्यांच्या श्रद्धेचा अपमान नाही तर चर्चमधील सर्वात पवित्र स्थानाचा - मंचाचाही अपमान आहे. जाणूनबुजून असं दृश्य दाखवून ख्रिश्चन धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा त्यांचा आरोप आहे. सुरुवातीला, समुदायानं थिएटरबाहेर निषेध करण्याची योजना आखली होती, पण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर निषेध थांबवण्यात आला. आता समुदायानं सहआयुक्तांना एक निवेदन सादर करून चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केले आहे आणि पीपल मीडिया फॅक्टरी, मैश्री मूव्ही मेकर्स आणि टीजी विश्व प्रसाद यांनी त्याची निर्मिती केली आहे. पण चित्रपटाबाबत जो राग दिसून येत आहे, तो आता निर्मात्यांसाठी अडचणीचा विषय बनत आहे. ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांनी याला 'जाणूनबुजून केलेला अपमान' म्हटलं आहे आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ख्रिश्चन समुदायानं सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटमही दिला आहे. जर निर्धारित वेळेत ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर निषेध आणखी तीव्र केला जाईल, असंही समुदायाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :