Jaat Box Office Collection Day 11: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अक्षय कुमारचा (Akshay Kumar) नवा चित्रपट 'केसरी 2' (Kesari 2) प्रदर्शित झाल्यानंतरही सनी देओलच्या (Sunny Deol) 'जाट'ला (Jaat Movie) काहीसा ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे. 'ढाई किलो का हाथ' फेम सनी देओलचा अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (रविवारी) चित्रपट रिलीज होऊन अकरा दिवस झाले आणि पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये जेवढी वाढ झाली, तेवढीच दुसऱ्या रविवारीही पाहायला मिळाली. या चित्रपटानं पहिल्या रविवारी
14 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर याआधी कधीही चित्रपटानं दुहेरी अंकाचा टप्पा ओलांडला नव्हता. आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. दरम्यान, चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली? ते सविस्तर जाणून घेऊयात...
जाट बॉक्स ऑफिस कलेक्शन
'जाट'च्या दरदिवसाच्या कमाईशी संबंधित डेटा स्वतंत्रपणे पाहता येईल. हे आकडे 10 दिवसांचे अधिकृत आकडे आहेत, त्यानुसार चित्रपटानं कालपर्यंत 70.09 कोटी रुपये कमावले होते. आकडेवारी सॅक्निल्कनुसार देण्यात आली आहे आणि सकाळी 10:20 पर्यंतचे आहेत. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
| दिवस | बॉक्स ऑफिस कलेक्शन ( कोट्यवधींमध्ये...) |
| पहिला दिवस | 9.62 |
| दुसरा दिवस | 7 |
| तिसरा दिवस | 9.95 |
| चौथा दिवस | 14.05 |
| पाचवा दिवस | 7.30 |
| सहावा दिवस | 6 |
| सातवा दिवस | 4.05 |
| आठवा दिवस | 4.27 |
| नववा दिवस | 3.95 |
| दहावा दिवस | 3.90 |
| अकरावा दिवस | 5.15 |
| एकूण कलेक्शन | 75.24 |
'जाट' सनी देओलचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल?
जर आपण सनी देओलच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांवर नजर टाकली, तर पहिल्या क्रमांकावर 2023 मध्ये आलेला 'गदर 2' आहे, ज्यानं बॉक्स ऑफिसवर 525.45 कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या क्रमांकावर या चित्रपटाचा पहिला पार्ट, गदर आहे, जो 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानं 76.88 कोटी रुपये कमावले होते.
दरम्यान, 'पुष्पा 2' आणि 'गुड बॅड अग्ली' सारख्या चित्रपटांचं प्रोडक्शन हाऊस मॅथ्री मूव्ही मेकर्सनी 'ही' फिल्म 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवली आहे. या चित्रपटात सनी देओल त्याच्या 90 च्या दशकातील 'अँग्री' अंदाजात दिसला आहे. त्याच्याशिवाय विनीत कुमार सिंह आणि रणदीप हुड्डा हे देखील चित्रपटात क्लासी अंदाजात दिसले आहेत.
सैयामी खेर, रेजिना कॅसेंड्रा, राम्या कृष्णन आणि जगपति बाबू यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी 'जाट'च्या यशाने आनंदी होऊन निर्मात्यांनी 'जाट 2'चा दुसरा पार्ट येणार असल्याचं सांगितलं. याबद्दल दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी म्हणाले आहेत की, हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा जास्त अॅक्शन आणि धमाकेदार असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :