Isha Malviya, Ek Number Tujhi Kambar : मराठीतील प्रसिद्ध गायक संजू राठोड (Isha Malviya) याचं 'एक नंबर तुझी कंबर' (Ek Number Tujhi Kambar) हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. संजूच्या या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालाय. यूट्यूबवरही या गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत, तर इन्स्टाग्रामवर देखील हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे. यापूर्वी संजू राठोडच्या (Sanju Rathod) अनेक गाण्यांना असाच प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान, संजू राठोडच्या सध्या व्हायरल होत असलेल्या गाण्यात डान्स करणारी ईशा मालवीय (Isha Malviya) सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. संजू सोबत 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर थिरकणारी ईशा मालविय आहे तरी कोण जाणून घेऊयात...
ईशा मालवीय (Isha Malviya) ही मध्य प्रदेशातील नर्मदापुरम (पूर्वीचं नाव होशंगाबाद) या शहरातील राहिवासी असणारी एक भारतीय अभिनेत्री आहे. लहान वयातच तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकलं आणि पुढे अभिनयाकडे वळली. तिचं बालपण मध्य प्रदेशात गेलं आणि शिक्षणही तिथंच झालं. ती फारशी मोठ्या शहरातून आलेली नसली, तरी तिने मुंबईसारख्या स्पर्धात्मक दुनियेत स्वतःचं नाव कमावलं.
ईशाची (Isha Malviya) खरी ओळख झाली ती कलर्स टीव्हीवरच्या ‘उडारियां’ या मालिकेमुळे. यात तिने जैस्मिन कौर संधू ही भूमिका केली होती. तिच्या अभिनयात आत्मविश्वास आणि ग्लॅमर याचं सुंदर मिश्रण होतं. ह्याच मालिकेतून तिला एक वेगळी ओळख मिळाली. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
तिचं सौंदर्य, स्टाईल आणि डान्समुळे तिला अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम मिळालं. ‘जिसके लिए’, ‘तू मिलिया’, ‘बॉम्ब बॉम्ब’ हे तिचे काही प्रसिद्ध गाणे आहेत. या गाण्यांनीही तिला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली.
ईशा ‘बिग बॉस 17’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. या शोमध्ये तिचं आणि अभिषेक कुमार यांचं नातं, वाद, मतभेद आणि भावना सगळं काही लोकांसमोर आलं. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रेक्षकांमध्ये खूप कुतूहल होतं. ‘बिग बॉस’मधून ती अजून जास्त चर्चेत आली आणि प्रेक्षकांनी तिची दुसरी एक बाजूही पाहिली.
ईशाने केवळ 13 वर्षांच्या वयात मॉडेलिंग सुरू केली. ती 'मिस मध्य प्रदेश 2017', 'शान ऑफ मध्य प्रदेश 2018' आणि 'मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड 2019' (द्वितीय उपविजेती) या स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती. ईशा बी प्राकच्या 'जिसके लिए' (2020), सोहिल खानच्या 'तू मिलिया' (2021) आणि 'बॉम्ब बॉम्ब' (2021) यांसारख्या म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. 2021 मध्ये, ईशाने कलर्स टीव्हीवरील 'उडारियां' या मालिकेत जैस्मिन कौर संधूची भूमिका साकारून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. 2023 मध्ये, ती 'बिग बॉस 17' मध्ये सहभागी झाली होती, जिथे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत होती.
ईशा मालवीय सध्या केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक प्रभावी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही आहे. ती स्वतःची एक वेगळी स्टाईल आणि अॅटीट्यूड घेऊन वावरते. स्क्रीनवरचा आत्मविश्वास हेच तिचं खास वैशिष्ट्य आहे. अल्पवयातच तीने जे यश मिळवलंय, त्यावरून असं वाटतं की ती भविष्यात आणखी यश मिळवेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या