Wankhede Stadium Ceremony : वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थिती होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर(Ajit Wadekar and) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण झाले. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचं उद्घाटन झाले.
रोहितसह मुंबई क्रिकेट असोसिएशन माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचंही स्टँड दिसणार आहे. त्यासह भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे नावही एका स्टँडला दिले गेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक पर्व सुरू होणार आहे. वानखेडे स्टेडियम, जिथे रोहितने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, तिथे आता रोहित शर्मा (Rohit Sharma Stand at Wankhede) स्टँड म्हणून ओळखले जाणारे स्टँड असेल. वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत आणि रोहितचे नावही त्या यादीत जोडल्या गेले आहे.
वानखेडे स्टेडियमवरील पॅव्हेलियनच्या तिसऱ्या लेव्हलला रोहितचे नाव देण्यात येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा टी-20 विश्वचषक आणि 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आहे. जरी त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे यश कायमचे अमर राहील. मुंबईसाठी त्याने 46 प्रथम श्रेणी सामने, 17 लिस्ट ए सामने आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत.
एक स्टायलिश नंबर ३ फलंदाज आणि भारताच्या सर्वोत्तम स्लिप क्षेत्ररक्षकांपैकी एक, अजित वाडेकर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील ऐतिहासिक परदेशातील कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व केले. त्यांनी 1966 ते 1974 दरम्यान 37 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आणि 1958-69 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. ऑगस्ट 2018 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
तर शरद पवार यांनी 2005 ते 5008 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि 2011 चा वर्ल्ड कप भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.