Isha Keskar: स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका आता नव्या वळणावर पोहोचली आहे. (Lakshmichya Pavalanni) कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशा केसकर (Isha Keskar) हिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. कलाचं पात्र गेल्याने चाहते मात्र नाराज झालेले दिसतात. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने या मालिकेचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोच्या खाली चाहत्यांनी कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केल्याचं दिसलेलं. पण आता मालिका सोडण्याचं खरं कारण काय? हे खुद्द कलाने अर्थात अभिनेत्री ईशा केसकरने सांगितलं आहे.
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या नवे ट्विस्ट पाहायला मिळतायत. या मालिकेत आता नवीन नाही का म्हणून नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने इशा केसकरने मालिका सोडली अशी चर्चा सुरू झाली होती. स्टार प्रवाहने शेअर केलेल्या मालिकेच्या प्रोमोमधूनही कथानकात बदल होणार असल्याचे संकेत मिळत होते. अखेर कलाने शेवटचा श्वास सोडला आणि अद्वैतची खरे निघून गेली. दरम्यान कलाच हृदय सुकन्या नावाच्या एका तरुणीला मिळाल्याचे दाखवलं आहे . कलाच्या एक्झिटमुळे चाहतेही नाराज झाले होते . नुकत्याच एका मुलाखतीत इशा केसकरने मालिका का सोडली? याचं कारण उघड केलं आहे.
काय म्हणाली इशा केसकर ?
गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मीच्या पावलांनी मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यात कला आणि अद्वैतचं पात्र, मालिकेत त्यांची मिश्किल भांडणं पाहणं चाहत्यांना आवडायचं. पण आता कला जग सोडून गेल्याचं दाखवल्याने मालिकेतन नवा ट्विस्ट आलाय. अभिनेत्री इशा केसकरने मालिका सोडली आहे. मालिका सोडल्याचं खरं कारण तिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत सविस्तर स्पष्ट केलं आहे . ती म्हणाली" मी सलग दोन वर्ष काम करत होते. जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी तशीच शूटिंग करत राहिले. पण ती दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. विश्रांती घेतली नाही तर भविष्यात डोळ्याची एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल. 15 ते 20 दिवस मी सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही. त्यामुळे सारासार विचार करून आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच मी मालिका सोडणार असल्याचे टीमला कळवलं होतं" असं इशा केसकरने सांगितलं.
ती पुढे म्हणाली " मध्यंतरी मला चिकनगुनिया आणि अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे मी काही दिवस रजेवर गेले होते. त्यावेळी मालिकेच्या टीमने माझी खूप काळजी घेतली. आता डोळ्याला दुखापत झाल्यामुळे पुन्हा सुट्टी मागणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मालिकेच्या कथेलाही अडथळा आला असता. त्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. " ती म्हणाली " आपण इतकी मेहनत करून पैसे कमवतो पण त्याचा आनंदच घेता आला नाही तर त्याचा काय उपयोग? म्हणून मी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. विश्रांती घेतल्यानंतर मी पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. " असंही इशा म्हणाली.