Irfan Pathan Movie : भारतीय क्रिकेट टीमचा माजी ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठान (Irfan Pathan) आता चित्रपटात आपला दम दाखवणार आहे. इरफान पठाण एका तमिळ चित्रपटातून पदार्पण करतोय. तमिळ सिनेमा 'कोबरा' (Cobra)मधून तो सिनेजगतात येतोय. कोबरा चित्रपटाचा टीझर देखील रीलिज झाला आहे. हा टीझर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे आणि चाहत्यांच्या पसंतीस देखील पडत आहे. अजय गनामुत्थु हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.


चित्रपटात इरफान पठाणचे नाव असलन यिलमाझ असं आहे. तो एका तुर्की इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तमिळ सुपरस्टार चियान विक्रम देखील दिसणार आहे. या चित्रपटात विक्रम मुख्य भूमिकेत आहे, इरफानची छोटी भूमिका साकारणार आहे. चियान विक्रम या चित्रपटात भारतीय हेराची भूमिका साकारत असून, बर्‍याच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात के एस रवी कुमार, श्रीनिधी शेट्टी यांच्यासारखे कलाकार देखील आहेत.


Video : पहा टीझर



ज्या वयात इतर खेळाडू करिअरची सुरुवात करतात तेव्हा माझं करिअर संपलं : इरफान पठाण


35 व्या वर्षी इरफान पठाणचा क्रिकेटला रामराम


वयाच्या 35 व्या वर्षी इरफान पठाणने क्रिकेटला रामराम ठोकला. तो सध्या क्रिकेट सामन्यात समालोचन करताना दिसून येतो. इरफान पठाणने संपूर्ण कारकिर्दीत 120 वन डे, 24 कसोटी आणि 29 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आजवरच्या कारकीर्दीत पठाणच्या खात्यात 173 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 301 विकेट्स जमा आहेत. त्याने 29 कसोटी सामन्यांमध्ये 100 विकेट्स, 120 एकदिवसीय सामन्यांमध्ये 173 विकेट्स आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये 28 विकेट्स मिळवल्या आहेत. फलंदाजीतही इरफानने सर्वसाधारण प्रदर्शन केलं आहे. 173 सामन्यांमध्ये 141 इंनिंग्समध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली. त्यात त्याने 2821 धावा जमवल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 2007 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयात इरफान पठाणनं मोलाचं योगदान दिलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या तीन भारतीयांमध्ये इरफान पठाणचा समावेश आहे.