Nana Patekar Interview About Virat Kohli : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, विराट कोहली त्यांचा आवडता क्रिकेटपटू आहे. कोहली त्यांचा आवडता खेळाडू आहे आणि तो लवकर आऊट झाला की, त्यांची भूक मरते आणि जेवण्याची इच्छा होत नाही. असंही नाना म्हणाले. यानंतर नाना पाटेकर यांचं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नाना पाटेकर यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे. विराट कोहलीचे चाहते यावर जोरदार प्रतिक्रिया देत, त्यांचीही परिस्थिती अशीच होते, असं सांगत आहेत. कोहली आऊट झाल्यावर नाना पाटेकर आणि विराटच्या चाहत्यांचा भावना एकसारख्या असल्याचं ते कमेंट करत सांगत आहेत.


नाना पाटेकर यांचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवण्यात आला. या सामन्या कोहली धावांचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा असताना तो लवकर बाद झाला. यामुळे भारतीयांचा हिरमोड झाला. कोहली आऊट झाल्यावर नाना पाटेकर यांनीही निराशा व्यक्त केली. नाना पाटेकर म्हणाले की, विराट कोहली आऊट झाल्यावर मला जेवण जात नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी मीम्स बनवण्यास सुरुवात केली आहे. कोहली आऊट झाल्यानंतर आता नाना जेवले की उपाशी आहेत? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तर, कोहली मैदानात खेळायला येण्याआधीच नानांनी जेवून घ्यावं असा सल्ला काही नेटकरी देत आहेत. 


नानांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल


नाना पाटेकर यांनी मुलाखतीतल म्हटलं की, विराट कोहली असा खेळाडू आहे, जो मला फार आवडतो. जर विराट आऊट झाला, तर माझी भूक संपते. माझी काही खाण्याची इच्छा होत नाही. TV 9 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नाना पाटेकर यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं, यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडूनही विराटचं कौतुक करण्यात येत आहे. विराट कोहली क्रिकेटप्रेमींच्या ह्रदयावर राज्य करणार 'किंग' आहे. 






 






 






 






 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rohit Sharma On Retirement : 'मी 2 मुलांचा बाप, कधी काय करायचं ते मला...'; सिडनी कसोटीदरम्यान रोहित शर्माचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा