Sun Marathi Serial Inspector Manju: 'कॉन्स्टेबल मंजू' आता 'इंस्पेक्टर मंजू' म्हणून पून्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या नव्या पर्वात मंजूच्या डॅशिंग लूक मध्ये एंट्री करतानाच्या सिक्वेन्सने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली तसेच सत्याचाही लूक पूर्णपणे बदलला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक राज्यातून मंजू आणि सत्या च्या जोडीला तसेच 'इंस्पेक्टर मंजू'ला भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत अभिनेत्री मोनिका राठी हीने मंजूची भूमिका साकारली आहे आणि अभिनेता वैभव कदम हा सत्याच्या भूमिकेत दिसेल. 29 सप्टेंबर 2025 पासून ही मालिका 'सन मराठी' वाहिनी वर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचायला सुरुवात झालेली आहे.

Continues below advertisement

कॉन्स्टेबल मंजू या मालिकेपासून प्रेक्षकांचं सत्या- मंजूबरोबर इतकं घट्ट नातं  निर्माण झालं होतं की, वयाच्या 84 व्या वर्षी दत्ता कर्णे हे आजोबा मंजूला पाहण्यासाठी थेट सेटवर पोहोचले. मालिकेचा प्रोमो जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हाच सत्या-मंजूचा पुढील प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह आधिक ऊंचीवर पोहोचला.  कॉन्स्टेबल मंजूच्या  नंतरच्या काळात सत्या - मंजूच्या नात्यात नक्की काय काय घडलं असेल? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. प्रेक्षकांसाठी मंजूचा नवा प्रवास आणखी रंगतदार आणि मनोरंजक असणार आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

मालिकेच्या नव्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांची लाडकी मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, "मंजू या नावाने मला प्रेक्षकांनी दिलेली ओळख ही माझ्यासाठी खूप आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. कॉन्स्टेबल मंजू ही भूमिका आजही प्रेक्षकांना खरी वाटते. आता या व्यक्तिरेखेचा नवा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. कॉन्स्टेबलची जबाबदारी पार पडल्यानंतर मंजू आता पुढील प्रशिक्षण घेऊन इन्स्पेक्टर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मंजूचा आत्मविश्वास, तिची मेहनत आणि प्रगती पाहून प्रेक्षकांना निश्चितच अभिमानाने भरून येईल. तिचं धाडस, चिकाटी आणि न्यायासाठीची लढाई आता अधिक जोमाने दिसणार आहे. मी स्वतःही या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे. इन्स्पेक्टर मंजू म्हणून अधिक दमदार अ‍ॅक्शन आणि नवीन स्टंट्ससाठी मी पूर्णपणे तयार आहे. हा प्रवास यशस्वी करण्यासाठी प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यापूर्वी तुम्ही आम्हाला जी आपुलकी आणि प्रेम दिलं, ते पुढेही तसंच लाभावं, हीच मनापासून इच्छा. तुमच्या मनोरंजनात कोणतीही कमी आम्ही भासू देणार नाही." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aai Tuljabhavani Marathi Serial Track: आईराजा उदो उदो! साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!