Samay Raina And India's Got Talent : गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन समय रैना (Samay Raina) हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावर देशभरातून आक्षेप घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातील एका शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या विधानानंतर हा वाद उफाळला होता. दरम्यान, आता समय रैना, या शोच्या परीक्षकांमध्ये उपस्थित असलेले प्रसिद्ध चेहरे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. असे असतानाच आता समय रैनाला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे, त्याची ऑनलाईन पद्धतीने समन्सला उपस्थित राहण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायालयाचा नेमका निर्णय काय?
इंडियाज गॉट लेटेन्ट हा कार्यक्रमाबाबत सध्या कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दाखल गुन्ह्यानुसार सध्या मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी या प्रकरणाशी निगडित असलेल्यांना मुंबई पोलिसांनी सन्मस बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. समय रैना यालादेखील समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्याने काही कारणास्तव प्रत्यक्षपणे न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही असे सांगत ऑनलाईन पद्धतीने या सुनावणीला उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. ही विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता समय रैना याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहूनच जबाब नोंदवावा लागणार आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे समय रैना याला एका प्रकारचा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे.
30 ते 40 जणांना नोटीस
मिळालेल्या माहितीनुसार इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावीरल आक्षेपाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले आहेत.या प्रकरणाशी संबंधित एकूण 30 ते 40 जणांना महाराषट्ट्र सायबर पोलिसांनी समन्स बजावले आहे. समय रैना मात्र या समन्सनुसार कार्यक्रमांना उपस्थित राहिलेला नाही. समन्स बजावून जर का या गुन्ह्याशी संबधित व्यकती चौकशीला गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे समय रैनावरही पुढची कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता पर्यंत रघुराम, देवेश दिक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवला आहे.
नेमका वाद काय आहे?
समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेन्ट हा कार्यक्रम चांगलाच प्रसिद्ध आहे. समय रैना यूट्यूबवर या कार्यक्रमाचे वेगवेगळे शो यूट्यूब चॅनेलवर अपलोड करतो. काही दिवसांपूर्वी असाच एक शो समयने यूट्यूबवर अपलोड केला होता. या कार्यक्रमात परीक्षकांच्या पॅनेलमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया उपस्थित होता. त्याने या शोमध्ये पालकांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर समय रैना, रणवीर अलाहाबादिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. सोबतच इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणीही केली गेली. याच प्रकरणात दाखल गुन्ह्यांनुसार मुंबई पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा :