India Defeating Pakistan On OTT: ओटीटीच्या (OTT Released) जगात भारत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत असल्याचं दिसून येतंय. जर आपण नेटफ्लिक्स पाकिस्तानबद्दल (Netflix Pakistan) बोललो तर, टॉप चित्रपट (Top Movies) आणि टॉप वेब सीरिजमध्येही (Web Series) भारताचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे, नेटफ्लिक्स पाकिस्तानमध्ये टॉपवर असलेल्या वेब सीरिजचा शाहरुख खानशी (Shah Rukh Khan) संबंध आहे. गोंधळलात ना? पाकिस्तानात टॉपवर असलेली वेब सीरिज शाहरुखचा मुलगा आर्यन खाननं दिग्दर्शित केलेली 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही आहे. या सीरिजनं पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानच्या मुलाची ही वेब सिरीज गेल्या 15 दिवसांपासून नंबर वनवर आहे. गंमत म्हणजे, टॉप दहामध्ये पाकिस्तानच्या एकाही सीरिजचा समावेश नाही.
नेटफ्लिक्स पाकिस्तानच्या टॉप 10 टीव्ही शोबद्दल बोलायचं झालं तर, आर्यन खानचा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' पहिल्या क्रमांकावर आहे, तर एलिस इन बॉर्डरलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'बिलियनेअर्स बंकर' ही वेब सीरिज तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि वेवर्ड चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर 'द गेम: यू नेव्हर प्ले अलोन' ही सीरिज आहे, हीसुद्धा एक भारतीय वेब सीरिज आहे.
नेटफ्लिक्स पाकिस्तानचा 'बॉन अॅपेटिट, युअर मॅजेस्टी' या यादीत सहाव्या स्थानावर आहे. वेन्सडे सातव्या स्थानावर आहे, हाऊस ऑफ गिनीज आठव्या स्थानावर आहे, अॅडलोसेन्स नवव्या स्थानावर आहे आणि सीआयडी दहाव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे, या यादीत पाकिस्तानी वेब सीरिज नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :