Imran Khan : प्रसिद्ध अभिनेता इमरान खान हा (Imran Khan) बऱ्याच वर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर राहात आहे. 2015 मध्ये त्याचा 'कट्टी बट्टी' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर इमराननं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. सध्या इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत, अशी चर्चा आहे. बरेच दिवस इमरान आणि अवंतिका हे वेगळे राहात आहेत.
एका रिपोर्टनुसार, अवंतिका मलिक आणि इमरान खान यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. इमरान आणि अवंतिका हे लग्नाआधी बरीच वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2011 साली त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2014 साली त्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी मुलाचे नाव इमारा असं ठेवलं. पण नंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. 2019 मध्ये अवंतिका ही इमरानला सोडून तिच्या आई- वडिलांकडे राहायला गेली.
इमरानवर आलेलं आर्थिक संकट असू शकतं कारण
रिपोर्टनुसार, इमरान खानला काम न मिळाल्यानं तो आर्थिक अडचणींचा सामना करत होता. त्यावेळी त्याच्या आर्थिक संकटाचा परिणाम त्याच्या मुलीवर होऊ नये, यासाठी अवंतिका ही इमाराला घेऊन तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली.
2020 मध्ये अवंतिकानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी अवघड असतात, असं लिहिलं होतं. काही दिवसांपूर्वी आमिरची मुलगी आयरा खान हिने इमरानसोबतचा फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये इमरान खानला पाहून अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले. काहींनी आयराच्या फोटोला कमेंट्स देखील केल्या. आयराच्या या फोटोला नेटकऱ्यांनी कमेंट करून इमरान खानला 'कुठे होता इतके दिवस?' असा प्रश्न विचारला आहे. जाने तू या जाने ना, आय हेट लव्ह स्टोरी, ब्रेक के बाद आणि लक या चित्रपटांमधून इमरान प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील इमरानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हेही वाचा :