OTT TOP WEB SERIES 2025: 2025 हे वर्ष ओटीटी विश्वासाठी खास ठरलं. यंदा कंटेंटची गुणवत्ता आणि वैविध्य दोन्हीच प्रेक्षकांना भुरळ घालणारं ठरलं. एका बाजूला जबरदस्त सस्पेन्स आणि इंटेन्स ड्रामा, तर दुसऱ्या बाजूला हलकी-फुलकी कॉमेडी आणि कौटुंबिक भावनांचा तडका पाहायला मिळाला. या वेब सिरीज केवळ लोकप्रिय ठरल्या नाहीत, तर त्यांच्या पात्रांपासून डायलॉग्स आणि कथांपर्यंत सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा रंगली. IMDBनुसार 2025 मध्ये सर्वाधिक प्रशंसा मिळवलेल्या टॉप-5 वेब सिरीज कोणत्या, ते जाणून घेऊया…
1) द फॅमिली मॅन (सीझन 3)
मनोज बाजपेयी यांची ही सुपरहिट सिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांची पहिली पसंती ठरली. श्रीकांत तिवारी आपल्या गुप्त मोहिमा आणि कौटुंबिक आयुष्य यामधील तोल कसा सांभाळतो, हे या सीझनमध्ये अधिक खोलवर मांडण्यात आलं आहे. नवे मिशन्स, धोकादायक व्हिलन्स आणि कौटूंबिक चढउतार सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं ठरलं.
2) द हंट: द राजीव गांधी असॅसिनेशन केस
1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या 90 दिवसांच्या तपासाची कहाणी अत्यंत वास्तववादी आणि संशोधनाधारित पद्धतीने या सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. गंभीर टोन असूनही सादरीकरण इतकं दमदार आहे की प्रत्येक भाग डॉक्युड्रामासारखा अनुभव देतो.
3) द बॅड्स ऑफ बॉलीवूड
एका महत्त्वाकांक्षी आऊटसाइडरच्या नजरेतून बॉलीवूडचं जग उलगडणारी ही सिरीज आहे. झगमगत्या पडद्यामागील संघर्ष, राजकारण आणि विचित्र परिस्थिती यांचं मजेशीर चित्रण यात पाहायला मिळतं. ह्युमर, कॅमिओ आणि ओव्हर-द-टॉप पात्रांमुळे ही सिरीज वेगळी ठरते.
4) पंचायत (सीझन 4)
‘पंचायत’ने 2025 मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. गावची साधी-सोपी दुनिया, सामान्य लोकांच्या समस्या आणि अभिषेकच्या आयुष्यातील नवे चढ-उतार यामुळे ही सिरीज सर्व वयोगटांसाठी परफेक्ट फॅमिली शो ठरली आहे.
5) बकैती
जुन्या गाझियाबादच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सिरीज एका कुटुंबाच्या आर्थिक अडचणींसोबतच भावंडांमधील नातेसंबंध अत्यंत रिलेटेबल पद्धतीने दाखवते. हलकी-फुलकी कॉमेडी आणि गोड कथा यामुळे ही सिरीज पूर्णपणे एंटरटेनिंग ठरते. OTTवर दर्जेदार कंटेंट शोधत असाल, तर 2025 मधील या IMDB टॉप-5 वेब सिरीज तुमच्या वॉच-लिस्टमधील ‘मस्ट वॉच’ ठरतील!