Hrithik Roshan Post On Grandfather Birth Anniversary : हृतिक रोशनने त्याच्या आजोबांच्या आठवणीत एक खास व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला आहे. दिवंगत संगीत दिग्दर्शक रोशन यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता हा व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओखाली त्याने आजोबांकरता मोठी नोट लिहिले आहे.
काय आहे पोस्ट
"आज माझ्या आजोबांची - रोशन यांची 106 वी जयंती आहे, ज्यांचे नाव मला वारसा हक्काने मिळाले आहे. जरी मला त्यांना भेटण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा किंवा शारीरिकरित्या त्यांचे प्रेम अनुभवण्याचे क्षण कधीच मिळाले नसले तरी त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेले गाणे हे माझासोबत कायम माझ्यासोबत असणार आहे. माझ्या आजोबांची गाणी रोशन कुटुंबाच्या प्रवासाचा पाया आहेत आणि मला त्यांच्या या घराण्याचा एक भाग असल्याचा खूप अभिमान आहे.आज त्यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या एका गाण्यापैकी माझे आवडते गाणे त्यांच्या आठवणीत मी शेअर करत आहे. 'ओह रे ताल मिले नदी के जल में' हे गाणे रेकाॅर्ड केल्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे हे यश मी आजच्या दिवशी साजरे करतो."
त्याने टाकलेला हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.एकाने लिहिले आहे, "रोशन लिगसी." तर दुसऱ्याने लिहिले आहे, "हे संगीत लोकांच्या मनात कायम राहील." आणखीन एका चाहत्याने लिहिले आहे की, "हे गाणे ऐकून ते आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत असे वाटते." संगीत दिग्दर्शक राजेश रोशन आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचे वडील रोशन यांचे 1967 मध्ये निधन झाले.
रोशन यांचे नावाजलेले गाणे
खयालो मै किसी के , मै दिल हू एक अरमान भरा , आपने याद दिलाया , ना तो कारवां की तलाश है , लगा चुनरी मै दाग हे त्यांचे काही गाजलेली गाणी आहेत
हृतिक रोशनचे आगामी चित्रपट
हृतिक रोशनच्या येत्या चित्रपटांबद्दस बोलायचे झाले तर, तो आगामी एरियल अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर' मध्ये दीपिका पदुकोण सोबत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याशिवाय, त्याच्याकडे ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत 'वॉर 2' देखील आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Marathi Serial: वादळवाट ते उंच माझा झोका; 'या' मराठी मालिकांचे टायटल साँग्स आजही आवडीने ऐकले जातात