Housefull 5 Box Office Collection Day 6: यंदाच्या वर्षातली सर्वात मोठी कॉमेडी फिल्म 'हाऊसफुल 5' सध्या थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमारची ही फिल्म 6 जून 2025 रोजी मोठ्या पडद्यावर झळकली. 'हाऊसफुल 5' (Housefull 5 Movie) रिलीज होऊन 6 दिवस झाले आणि फिल्मनं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पण, फिल्म हिट झाली की, फ्लॉप? याची पोलखोल झालीय.
'हाऊसफुल 5'च्या प्रोडक्शन हाऊस नाडियाडवाला ग्रँडसननं दिलेल्या माहितीनुसार, फिल्मनं घरगुती बॉक्स ऑफिसवर 24.35 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. फिल्मनं दुसऱ्या दिवशी 32.28 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 35.10 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. 'हाऊसफुल 5'नं चौथ्या दिवशी 13.15 कोटी आणि पाचव्या दिवशी 11.70 कोटींची कमाई केलेली. अशातच आता सहाव्या दिवसाच्या सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.
'हाऊसफुल 5'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अक्षय कुमारची कॉमेडी फिल्म 'हाऊसफुल 5'नं सहाव्या दिवशी आतापर्यंत (रात्री 11 वाजेपर्यंत) 8 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. यासोबतच घरगुती बॉक्स ऑफिसवर फिल्मनं एकूण 124.68 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. फिल्मच्या बजेटबाबत बोलायचं तर सॅकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, 'हाऊसफुल 5'चं बजेट 225 कोटी रुपये आहे. प्रिंट आणि मार्केटिंगचं भांडवल पकडून एकूण बजेटबाबत बोलायचं तर, 350 कोटी रुपये होतं.
'हाऊसफुल 5' हिट की, फ्लॉप?
कोणताही सिनेमा हिट होण्याचा फॉर्म्युला आहे की, त्या बजेटहून दुप्पट कलेक्शन करावं लागेल. आतापर्यंत 'हाऊसफुल 5' आपलं बजेटही वसूल करू शकलेली नाही. त्यामुळे फिल्म हिट झाल्याचं अजूनतरी म्हणता येणार नाही. फिल्म हिट होण्यासाठी सर्वात आधी एकूण भांडवलाचा आकडा पार करावा लागेल.
'हाऊसफुल 5'ची स्टारकास्ट
'हाऊसफुल 5'चं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं आहे. तर, नाडियाडवाला ग्रँडसन बॅनरखाली ही फिल्म बनवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सिनेमा मल्टीस्टारर सिनेमा असल्यामुळे सिनेमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी झळकले आहेत. या फिल्ममध्ये अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, चित्रांगदा सिन्हा, चंकी पांडे, जैकी श्रॉफ, जॉनी लिवर आणि नाना पाटेकर यांरखे दिग्गज झळकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :