Housefull 5 Box Office Collection Day 5: 2025 मधील बहुप्रतिक्षित प्रँचायझी चित्रपट 'हाऊसफुल्ल 5'ची (Housefull 5) क्रेझ प्रेक्षकांच्या डोक्यावर चढली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), नाना पाटेकर (Nana Patekar), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अभिषेक बच्चन (Abhishekh Bacchan) स्टारर सिनेमानं थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सिनेमा छप्परफाड कमाई करत आहे. 'हाऊसफुल्ल 5' (Housefull 5 Movie) रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बक्कळ कमाई करत आहे.
'हाऊसफुल 5' 6 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन 5 दिवस उलटले आहेत. गेल्या चार दिवसांत या चित्रपटानं इतर अनेक चित्रपटांना मागे टाकत विक्रम रचला. आता 'हाऊसफुल 5'नं 2025 सालच्या तिसऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटाचा किताब जिंकला आहे. 'हाऊसफुल 5'नं पाचव्या दिवसाच्या कलेक्शनसह हा विक्रम रचला आहे.
'हाऊसफुल 5'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
'हाऊसफुल 5'चं प्रोडक्शन हाऊस असलेल्या नाडियाडवाला ग्रँडसनच्या मते, चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 24.35 कोटी रुपयांपासून सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं तब्बल 32.38 कोटी रुपये कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी चित्रपटानं 35.10 कोटी रुपये आणि चौथ्या दिवसाचं कलेक्शन 13.15 कोटी रुपये झालं आहे. यासह, 'हाऊसफुल 5'नं 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आणि एकूण 104.98 कोटी रुपये कमावले. आता पाचव्या दिवसाचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.
सॅकनिल्कच्या मते, 'हाऊसफुल 5'नं पाचव्या दिवशी भारतात रात्री 11 वाजेपर्यंत 10.75 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता 115.73 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
'हाऊसफुल 5' 2025 चा तिसरा सर्वात मोठा चित्रपट
सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट भारतात 110.1 कोटी रुपये कमाई करून कमाई करत होता. अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट या वर्षीचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता, ज्यानं 112.75 कोटी रुपये कमाई केली. आता 'हाऊसफुल 5'नं 'सिकंदर' आणि 'स्काय फोर्स'च्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे. यासह, 'हाऊसफुल 5' या वर्षीचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.