Housefull 5 Box Office Collection Day 14: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' (Housefull 5) हा चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून हा मल्टिस्टारर सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र चित्रपटाच्या कमाईट कमालीची घट पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस 'हाऊसफुल 5'ची कमाई कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच रिलीजच्या 14व्या दिवशी सिनेमानं किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'हाऊसफुल 5' नं चौदाव्या दिवशी किती कमाई केली?
अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्यासह 19 कलाकारांचा अभिनय असलेला 'हाऊसफुल 5' हा चित्रपट 'हाऊसफुल 5A' आणि 'हाऊसफुल 5B' या दोन आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये बरीच क्रेझ दिसून आली. अपेक्षेप्रमाणे, 'हाऊसफुल 5'नं बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आणि नंतर पहिल्या आठवड्यातही त्यानं दमदार गल्ला जमवला.
दुसऱ्या आठवड्यात त्याची कमाई मंदावलेली दिसून आली. जरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली आहे आणि वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील बनला आहे. पण, त्याचं बजेट वसूल करण्यापासून तो अजूनही अनेक कोटी दूर आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 'हाऊसफुल 5' नं रिलीजच्या 13 दिवसांत 174.09 कोटी रुपये कमावले आहेत.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चौदाव्या दिवशी 'हाऊसफुल 5'ची कमाई 2.43 कोटी रुपये होती.
- यासह, 14 दिवसांत 'हाऊसफुल 5'ची एकूण कमाई आता 176.52 कोटी रुपये झाली आहे.
'हाऊसफुल 5'ला मागे टाकणार, 'सितारे जमीन पर'?
'हाऊसफुल 5'नं बॉक्स ऑफिसवर बरीच चर्चा निर्माण केली असली तरी, हा चित्रपट 200 कोटींचा चित्रपट बनला नाही आणि त्याचा खर्चही वसूल झालेला नाही. आता आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' देखील शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची खूप चर्चा आहे आणि त्यानं अॅडव्हान्स बुकिंगमध्येही कोट्यवधींची कमाई केली आहे.
अशा परिस्थितीत, 'सितारे जमीन पर' आता 'हाऊसफुल 5'चा खेळ बिघडवू शकतो आणि हिट होण्याच्या दिशेनं वाटचाल करणारा हा चित्रपट फ्लॉप होऊ शकतो. असो, 'सितारे जमीन पर'समोर 'हाऊसफुल 5' किती कलेक्शन करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :