Housefull 5 Box Office Collection Day 13: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची (Akshay Kumar) कॉमेडी फ्रँचायझी 'हाऊसफुल 5' (Housefull 5) ची क्रेझ प्रेक्षकांच्या मनातून जात नाहीये. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मल्टिस्टारर असलेला हा सिनेमा 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि आता 13 दिवसांच्या कलेक्शनसह 'हाऊसफुल 5' या वर्षातील दुसरा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे.

'हाऊसफुल 5'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 133.58 कोटी रुपये कमावले. चित्रपटानं आठव्या दिवशी 6.60 कोटी, नवव्या दिवशी 10.21 कोटी आणि दहाव्या दिवशी 12.21 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. 'हाऊसफुल 5'नं अकराव्या दिवशी 3.80 कोटी आणि बाराव्या दिवशी 4.40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता चित्रपटाच्या तेराव्या दिवसाच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.                 

'रेड 2' ला मागे टाकून रचला मोठा रेकॉर्ड 

सॅक्निल्कच्या वृत्तानुसार, 'हाऊसफुल 5'नं तेराव्या दिवशी (रात्री 11 वाजेपर्यंत) 3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 173.89 कोटी रुपये झालं आहे. यासोबतच, 'हाऊसफुल 5'नं या वर्षी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनचा आकडा ओलांडला आहे. 'रेड 2'नं भारतात एकूण 172.75 कोटी रुपये कमावले होते. अजय देवगणच्या चित्रपटाला मागे टाकून, 'हाऊसफुल 5' हा 2025 चा दुसरा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे.

'हाऊसफुल 5' वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ओलांडला 250 कोटींचा टप्पा 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हाऊसफुल 5'चं बजेट 350 कोटी रुपये आहे. चित्रपटानं त्याच्या बजेटच्या निम्म्या रकमेची वसुली केली आहे. तसेच, 'हाऊसफुल 5' देखील जगभरात चांगला व्यवसाय करत आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटानं जगभरात 250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

दरम्यान, साजिद नाडियाडवाला यांची निर्मिती असलेल्या 'हाऊसफुल 5'तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केला आहे. फिल्ममध्ये अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांसारख्या सिनेस्टार्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बॉबी देओलचाही कॅमिओ आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Farhan Akhtar : फरहान अख्तरचा '120 बहादुर': मेजर शैतान सिंह यांच्या वीरगाथेचा थरार, लवकरत रुपेरी पडद्यावर