'Housefull 5' Box Office Collection Day 1: प्रेक्षकांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक यांच्यासह मल्टीस्टार चित्रपट 'हाऊसफुल 5' शुक्रवारी 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सुरुवातीपासूनचे बुकिंग जोरदार चालू होते सोबतच रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती.
'हाऊसफुल 5' ने पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई'हाऊसफुल 5' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. खरेतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसवरील कमाई वाढवण्यासाठी दोन वेगवेगळे शेवट करुन चित्रपट रिलीज करण्याची एक अनोखी मार्केटिंग रणनीती वापरली. हा चित्रपट 'हाऊसफुल 5ए' आणि 'हाऊसफुल 5बी' या दोन आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित झाला. जरी दोन्ही आवृत्त्यांच्या पहिल्या दोन तासांमध्ये कथा सारखीच असली तरी शेवटच्या 20 मिनिटांचा क्लायमॅक्स वेगळा आहे आणि दोन्हीमध्ये खलनायक अलणारे हत्यारे देखील वेगळे आहेत.
असे असताना हे दोन क्लायमॅक्स पाहण्यासाठी लोकांना 'हाऊसफुल 5' दोनदा पाहावा लागेल. निर्मात्यांच्या या अनोख्या रणनीतीमुळे चित्रपटाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. आणि जेव्हा हा चित्रपट दुहेरी क्लायमॅक्ससह मोठ्या पडद्यावर पोहोचला तेव्हा त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. आता त्याच्या पहिल्या दिवसाची कमाईही समोर आली आहे.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार 'हाऊसफुल 5' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 23 कोटींची कमाई केली आहे. जरी ही प्राथमिक आकडेवारी असली तरी अधिकृत डेटा जाहीर झाल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात.
'हाऊसफुल 5' हा वर्षातील तिसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला'हाऊसफुल 5' या चित्रपटाने प्रदर्शित होताच अनेक विक्रम केले आहेत. 23 कोटींच्या कमाईसह, हा चित्रपट छावा (33 कोटी) आणि सिकंदर (27.50 कोटी) नंतर 2025 मधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला आहे. यासह, त्याने अजय देवगणचा रेड 2 (19.71), सनी देवोलचा जट (9.62कोटी) आणि अक्षयचा केसरी चॅप्टर 2 (7.84 कोटी), भूल चुक माफ (7.20कोटी) या वर्षातील 21 चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकले आहे.
'हाऊसफुल 5' हा फ्रँचायझीचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. हाऊसफुल 5 ने फ्रँचायझीच्या सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रमही केला आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या हाऊसफुल 4 च्या पहिल्या दिवशीच्या 19.08 कोटींच्या कमाईला या चित्रपटाने मागे टाकले आहे.
भारतीय बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल चित्रपटांचे हे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आहेत.
हाऊसफुल (2010) – 10 कोटीहाऊसफुल 2 (2012) – 14 कोटी रुपयेहाऊसफुल 3 (2016) – 15.21 कोटी रुपयेहाऊसफुल 4 (2019) – 19.08 कोटीहाऊसफुल 5 (2025)- 25 कोटी
साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती केलेला आणि तरुण मनसुखानी यांच्याद्वारे दिग्दर्शित 'हाऊसफुल 5' या चित्रपटात एकूण 20 कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सौंदर्या शर्मा, नाना पाटेकर असे अनेक पक्के कलाकार आहेत.