1 जून 1926 रोजी लॉस एन्जेलीस येथे मर्लिन मुन्रोचा जन्म झाला. लाईट्स, कॅमेरा, फॉटोग्राफर्स आणि पत्रकार यांनी वेढलेल्या मर्लिनच्या त्या उडणाऱ्या स्कर्टच्या फोटोची चर्चा आजही होते. जाणून घेऊयात अभिनेत्री मर्लिन मुन्रोबद्दल....
मर्लिन मुन्रोच्या मृत्यूचं गूढ
4 ऑगस्ट 1962 रोजी लॉस एंजिलिस येथे मर्निनचं झालं निधन. मर्लिनच्या रुममधून आवाज येत नाही, असं मर्लिनसोबत असणाऱ्या हाऊसकिपरला 5 ऑगस्ट 1962 जेव्हा लक्षात आलं. त्या हाऊसकिपरनं मर्लिनच्या मानसोपचारतज्ज्ञाला फोन केला. रुमची खिडकी तोडून जेव्हा हाऊसकिपर रुममध्ये गेला. तेव्हा मर्निन ही त्याला बेडवर पडलेली दिसली. तिच्या हातात टेलिफोन होता. बेडजवळ एक रिकामी बॉटल होती. मर्लिननं आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला? हे अजूनही कोणाला माहित नाही. अनेकांचे असे मत आहे की, हाऊसकिपरला नोकरीवरुन मर्लिननं काढलं म्हणून त्यानं तिचा खून केला. मर्लिन मुन्रोचा मृत्यू हा आजही चर्चेचा विषय आहे.
मर्लिनचं शेवटचं फोटोशूट
मर्लिननं कॉस्मोपोलिटन आणि वोग यांच्यासोबत एक करार साइन केलं होतं. तिचं शेवटचं फोटोशूट बर्ट स्टर्न यांनी केलं. मर्लिनचं हे न्यूडफोटोशूट होते. मर्लिनच्या मृत्यूनंतर तिच्या या फोटोला द लास्ट सिटिंग असं नाव देण्यात आलं.
हेही वाचा: