Hindustani Bhau Warns Raj Thackeray: सध्या महाराष्ट्रात (Maharashtra News) भाषेवरुन राजकारण पेटलं आहे. राज्य सरकारनं काढलेल्या हिंदी भाषेच्या (Hindi Language) जीारनंतर राज्यात अनेकांनी या जीआरच्या विरोधात भूमिका घेतली. एवढंच काय तर, गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्याही कारणासाठी कधीच राजकीयदृष्ट्या एकत्र न आलेले ठाकरे बंधू मराठीच्या मु्द्द्यावर एकत्र दिसले. जीआरवरुन प्रचंड मोठा गदारोळ झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी जीआर मागे घेतला आणि वरळीत विजयी मेळाव्याचं आयोजन केलं. अशातच मराठी न बोलणाऱ्या एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला. या घटनेवर वरळीतील विजयी मेळाव्यात राज ठाकरेही (Raj Thackeray) बोलले होते. आता यावरुनच 'हिंदुस्तानी भाऊ'नं (Hindustani Bhau) नाराजी व्यक्त केलेली. तसेच, 'हिंदुस्तानी भाऊ'नं व्हिडीओ शेअर करुन राज ठाकरेंना विनंतीही केली आहे. 

'हिंदुस्तानी भाऊ' थेट राज ठाकरेंचं नाव घेत म्हणाला... 

'हिंदुस्तानी भाऊ' म्हणाला की, "जय महाराष्ट्र! आणि हा 'जय महाराष्ट्र' आहे, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंना... साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीत, महाराष्ट्रात मराठी भाषा ही केवळ 'गर्व' नाही, तर 'माज' आहे असं बोललं जातं. मराठी असल्याचा गर्वच नाही, माज आहे. पण साहेब, याच मराठीच्या नावाखाली इथे आलेल्या भारतातील हिंदू बांधवांना मारहाण करणं चुकीचं आहे."

भाषेच्या शिक्षणाबाबत तो पुढे म्हणाला, "शाळेत असो वा कॉलेजमध्ये, मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी तुम्हाला जेवढी ताकद लावायची आहे, ती लावा साहेब. संपूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण साहेब, गरिबांना मारणं खूप चुकीचं आहे. ते इथे फक्त नोकरी-धंद्यासाठी आले आहेत. आज आपले महाराष्ट्रातील लोकंही दुसऱ्या राज्यांत शिक्षण घेण्यासाठी किंवा कामधंद्यासाठी जातात. तिथे जर याच कारणामुळे आपल्या मराठी लोकांना मारलं गेलं, तर तुम्ही काय करणार, साहेब?"

हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब; हिंदुस्थानी भाऊचं राज ठाकरेंना आवाहन 

पुढे बोलताना 'हिंदुस्तानी भाऊ'नं राज ठाकरेंना भावनिक आवाहन केलं. हिंदुस्थानी भाऊ म्हणाला, "कोणाला मारणं खूप सोपं असतं साहेब, पण सगळ्यांना एकत्र आणणं खूप कठीण असतं. हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब. कारण बाळासाहेबांनंतर त्यांची सावली राजसाहेबांमध्ये बघितली जाते. इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, असं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात साहेब."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

KRK Slams Paresh Rawal: 'जो माणूस स्वतःची लघवी पिऊ शकतो, तो पब्लिसिटीसाठी...'; परेश रावल यांच्या 'हेरा फेरी 3' स्टंटवर भडकला 'हा' प्रसिद्ध खान