Hindustani Bhaus Video on Jaya Bachchan Goes Viral: विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ आपल्या बिनधास्त विधानांसाठी ओळखला जातो. यामुळे तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. हिंदुस्थानी भाऊ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यानं अलिकडेच राज्यसभेच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यावर आपला राग व्यक्त केला आहे. जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापाराझींवर कमेंट केली होती. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भाऊने थेट जया बच्चनवर राग व्यक्त केला. "जिथे आदर केला जात नाही, तिथे जाऊ नका", अशी विनंती त्यानं पापाराझींसमोर केली. सध्या हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील भाऊच्या वक्तव्यावर समर्थन दर्शवलं.
हिंदुस्थानी भाऊ याने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने पापाराझींसमोर एक विनंती केली. जया बच्चनने पापाराझींवर केलेल्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. "त्या अभिनेत्रीनं तुमच्या कपड्यांवर कमेंट केली. बरोबर? अमिताभ बच्चन यांच्या पत्नीचे नाव काय? जया बच्चन ना? त्या स्वत: कुराड बाजारातील दीडशे रूपयांची साडी नेसतात. या लोकांना तुम्ही गरीब म्हणतात. तुम्ही अशा लोकांच्या मागे मागे का जाता? जिथे तुम्हाला आदर मिळत नाही? जर तुम्ही त्यांना जगाला दाखवणे थांबवाल, तेव्हा अशा लोकांना त्यांची जागा कळेल. हे लोक तुम्ही दाखवता, म्हणून ते दिसतात.. नाहीतर, यांना कुणी कुत्रा देखील ओळखणार नाही", असं हिंदुस्थानी भाऊ म्हणाला.
"जिथे तुम्हाला आदर मिळणार नाही... तिथे तुम्ही जाणं टाळा. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, आम्ही आज जे काही झालो आहोत, ते फक्त तुमच्यामुळेच. जर आम्ही तुमचा आदर केला नाही. तर, अशावेळी तु्म्ही ही बाब विचार करणे गरजेचं आहे. तुमच्यावर एक बॉस बसलाय, तुम्ही त्याला अशा लोकांना भेटायला जायला सांगा. जिथे आदर केला जात नाही, तिथे मालकाला जायला सांगा. तिथे यांचा अपमान होईल, तेव्हा यांना कळेल. म्हणून हात जोडून सांगतोय.. अशा लोकांच्या अजिबात मागे जाऊ नका", अशी विनंतीही हिंदुस्थानी भाऊ यांनी केली.
पापाराझींना जया बच्चन नेमकं काय म्हणाल्या?
काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी बरखा दत्तच्या मोजो स्टोरी शो 'वी द वुमन'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पापराझींबाबत मत व्यक्त केलं. "माझं मीडियाशी खूप चांगले संबंध आहेत. पण पापाराझींशी नाही. ही लोक बाहेर घाणेरडे अन् घट्ट पॅन्ट घालून फिरतात. हातात मोबाईल घेऊन फिरत असतात. त्यांना असं वाटतं की, मोबाईल फोन असल्यावर आपण कुणाचेही फोटो क्लिक करू शकता, हवं ते करू शकता. तुम्ही माझा तिरस्कार करता, हे तुमचे मत आहे. मी खूप तुम्हा लोकांचा तिरस्कार करते. तुम्हाला वाटते की तुम्ही मोबाईल कॅमेरा घेऊन उंदिरासारखे एखाद्याच्या घरात घुसू शकता".