Shilpa Shinde False Harassment Allegation Controversy: 'अंगुरी भाभी' (Angoori Bhabhi) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदेनं (Shilpa SHinde) एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक खुलासा केला. तिनं 'भाबीजी घर पर हैं' (Bhabhiji Ghar par Hai) या मालिकेतील प्रॉड्यूसरवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, तिनं केलेले आरोप सर्व खोटे होते, असा मोठा खुलासा तिनं स्वत:च केला (Entertainment). शिल्पा शिंदेनं केलेल्या खुलाशानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अभिनेत्रीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, या मागणीनं आता जोर धरलाय. सोशल मीडियावर वापरकर्ते शिल्पा शिंदेवर आपला संताप व्यक्त करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अभिनेत्री हिना खान हिनं देखील प्रतिक्रिया दिली आहे.  अभिनेत्रीने शिल्पा शिंदेच्या आरोपांना 'लाजिरवाणे' म्हटले असून,  या प्रकरणात 'भाबीजी घर पर हैं'चे प्रॉड्यूसर संजय कोहली हे  खरे पीडित असल्याचं तिनं म्हटलं आहे.

Continues below advertisement

हिना खाननं शिल्पा शिंदेचं नाव न घेता तिच्यावर टीका केली (Bhabiji Ghar Par Hain producer controversy)

हिना खाननं इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं शिल्पावर जोरदार टीका केली असून, वैयक्तिक फायद्यासाठी लैंगिक छळाच्या आरोपांचा गैरवापर केल्याचा तिनं निषेध केला आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, 'मी खरंतर दुसऱ्यांविषयी कधीही बोलत नाही.  मी कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत नाही.  जेव्हा अत्यंत सेसिंटिव्ह मुद्दा असतो, तेव्हाच मी बोलते. किंवा सामाजिकदृष्ट्या विशेषत: महिलांवर परिणाम करणारी एखादी गोष्ट असते, तेव्हाच मी माझे मत मांडते'.

शिल्पा शिंदेवर हिना खानचा संताप (Hina Khan Instagram post on false allegations)

'एखादा वाद जिंकण्यासाठी एखाद्याची प्रतिमा डागाळण्याकरिता आपल्या स्त्रीत्वाचा वापर करणे अत्यंत लाजिरवाणे आहे', असं हिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'मला किती मोठा धक्का बसला, हे मी खरंतर शब्दांत सांगू शकत नाही. पण मला इथे खरे पीडित कोण आहे, याबद्दल बोलायचं आहे.  एक प्रतिष्ठित व्यक्ती, ज्याला पत्नी, मुलगी आणि त्यांच्या कुटुंबात इतर महिला आहेत'.

Continues below advertisement

'फिमेल अॅक्टरने  स्वीकार केलंय की, तिनं केलेले आरोप केवळ निराधार नव्हते तर,  तिनं कायद्याचा आधार न घेता  फायदा मिळवण्यासाठी,  जिंकण्यासाठी, हक्क सांगण्यासाठी, हिशोब चुकता करण्यासाठी केला आहे.  एवढं सगळं घडून सुद्धा, त्या प्रॉड्यूसरने त्याच व्यक्तीला शोमध्ये कास्ट केलंय', असं म्हणत अभिनेत्रीनं आश्चर्य व्यक्त केलं.  'खोटे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीने, 10 वर्षांपूर्वी जे केले होते, तेच जर तिने पुन्हा केले तर काय होईल?  मी पूर्णपणे थक्क झाले आहे. उलट आमचीच चेष्टा सुरू आहे, असं वाटतंय', असंही अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?