Hina Khan Reacts Sharply to Shilpa Shindes Remarks: टीव्ही इंडस्ट्रीतील (Entertainment) दोन मोठी नावं शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) आणि हिना खान (Hina Khan) यांच्यात सध्या कोल्ड वॉर सुरू आहे. नुकतंच शिल्पा शिंदेनं एका पॉडकास्टमध्ये आपण 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेतील निर्मात्यावर खोटे लैंगिक छळाचे आरोप केले असल्याचं म्हटलं होतं. यानंतर शिल्पा शिंदेवर टीका करण्यात आली. जेव्हा अभिनेत्री हिना खानने शिल्पाच्या धक्कादायक खुलाशाला 'लाजिरवाणे' असे म्हटले, तेव्हा शिल्पाने तिच्यावर, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. आता अभिनेत्री हिना खानने पंतप्रधान मोदी यांना आवाहन करत, शिल्पा शिंदेला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.
शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्या कोल्ड वॉर सुरू आहे (Shilpa Shinde false harassment allegation)
खरंतर शिल्पा शिंदेनं कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टवर धक्कादायक खुलासा केला होता. मालिकेतून काढून टाकल्यानंतर आणि मानधन न मिळाल्यामुळे, तिनं निर्मात्याविरोधात लैंगिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंतर हे प्रकरण मिटले. तिला तिची रक्कम मिळाली. हिना खानने या प्रकरणाला लाजिरवाणे असं म्हटलंय. याला प्रत्युत्तर म्हणून शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला. तसेच हिनावर टोला लगावला. तिनं हिनाचं नाव न घेता टोला लगावला.
शिल्पा म्हणाली, 'लोक माझ्या नावाने प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न कधी थांबवतील, हे मला माहित नाही. पण धावत्या ट्रेनमध्ये चढू नका. तुम्हाला दुखापत होईल. बरोबर? प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हा लोकांकडून स्वत:चे आजार आहेत, कुटुंबातील सदस्य मरण पावले आहेत, मग तुम्हाला शिल्पा शिंदेची गरज का आहे? तु्म्ही आधीच खूप प्रसिद्ध आहात', असं शिल्पाने म्हटलं.
शिल्पा शिंदेनं केलेल्या टीकेला हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सडेतोड उत्तर देत एक स्टोरी शेअर केली आहे. हिनाने थेट पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदेमंत्री यांचा पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदेमंत्री, कृपया ज्या गुन्हेगारांनी आपले गुन्हे कबूल केले आहेत, त्या सर्वांना सोडा. कारण त्यांच्यात धैर्य आहे. कारण ते लढवय्ये आहेत. कारण ते सत्याच्या बाजूने उभे आहेत. तसेच जेव्हा त्यांनी गुन्हा केला होता, तेव्हा त्यांच्यासोबत कुणीही नव्हते', असं हिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
