IND vs AFG One-off Test : भारतीय क्रिकेट संघ 6 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना WTC स्पर्धेच्या चक्राचा भाग नसला तरी आगामी महत्त्वाच्या मालिकांच्या तयारीसाठी त्याला विशेष महत्त्व आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी संघनिवडीबाबत काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

Continues below advertisement

साई सुदर्शनला मिळू शकते नंबर-3 वर संधी (Sai Sudharsan IND vs AFG One-off Test)

गंभीर यांनी स्पष्टपणे सांगितले की, युवा डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी दिली जाऊ शकते. गंभीर म्हणाले की, “साई सुदर्शनने आतापर्यंत जे सामने खेळले त्यातील बहुतेक सामने इंग्लंडमध्ये झाले. अशा परिस्थितीत त्याचे मूल्यमापन काही मोजक्या डावांवरून करणे योग्य ठरणार नाही. त्याला सातत्याने संधी मिळायला हवी.” त्यामुळे संघ व्यवस्थापन देवदत्त पडिक्कल याऐवजी साई सुदर्शनला प्राधान्य देण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Continues below advertisement

आयपीएलमधील दमदार कामगिरीचा फायदा (Sai Sudharsan IPL 2026)

साई सुदर्शनने नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात 700 हून अधिक धावा करत शानदार कामगिरी केली होती. त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो भारतीय संघाच्या भविष्यातील कसोटी योजनांचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. गंभीर यांनी सांगितले की, “जर आपण एखाद्या खेळाडूचे मूल्यमापन फक्त चार-पाच सामन्यांच्या आधारे केले, तर त्याच्याबाबत योग्य निष्कर्ष काढणे कठीण होईल. साई सध्या खराब फॉर्ममध्ये नाही आणि त्याच्यात मोठी क्षमता आहे.”

चौथ्या फिरकीपटूच्या शोधात टीम इंडिया (IND vs AFG One-off Test)

या सामन्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिरकी गोलंदाजांची निवड. डावखुरे फिरकीपटू मानव सुथार आणि हर्ष दुबे यांच्यात एका स्थानासाठी स्पर्धा आहे. गंभीर यांच्या मते, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यावर भारत चार फिरकीपटूंना घेऊन जाण्याची योजना आखत आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यात दोघांपैकी कोण अधिक प्रभावी ठरतो याकडे संघ व्यवस्थापनाचे लक्ष असेल. ते म्हणाले, “मानव आणि हर्ष यांची शैली काही बाबतीत सारखी असली तरी दोघांच्या गोलंदाजीमध्ये वेगळेपण आहे. हा सामना आम्हाला चौथा फिरकीपटू तयार करण्यासाठी मदत करेल.”

श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यांची तयारी

गंभीर यांनी आगामी परदेश दौऱ्यांबाबतही भाष्य केले. त्यांच्या मते, श्रीलंका आणि न्यूझीलंडसारख्या वेगवेगळ्या परिस्थिती असलेल्या देशांमध्ये यश मिळवण्यासाठी भारतीय संघाला अधिक चांगली तयारी करावी लागेल. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक देशातील खेळपट्ट्या आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण यशासाठी अधिक सखोल तयारी आवश्यक आहे.”

ऋषभ पंतबाबतही स्पष्ट मत (Gautam Gambhir on Rishabh Pant)

दरम्यान, कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून ऋषभ पंत याला हटवण्यात आल्याच्या चर्चांवरही गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पंतला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. गंभीर म्हणाले, “आम्हाला ऋषभ पंतच्या नैसर्गिक आक्रमक शैलीत बदल करायचा नाही. पण प्रत्येक खेळाडूने सामन्याची परिस्थिती ओळखून निर्णय घेणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खूप महत्त्वाचे आहे.”

हे ही वाचा -

IND vs AFG ODI Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अपडेट समोर