Hema Malini Post On Batwara 1947: अभिनेता सनी देओलचा 'बटवारा 1947' (Batwara 1947) नुकताच प्रदर्शित झाला. 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळतंय. भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट इतिहासातल्या त्या कठीण काळातलं दुःख, कुटुंबांची ताटातूट, बंधुत्व आणि परस्पर आदराचा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात सनी देओलसह प्रीती झिंटा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचं भरभरून कौतुक होत असताना अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी सनीच्या 'बटवारा 1947' चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. x माध्यमावर त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत 'माणुसकी आणि एकतेचा संदेश देणारा हा सिनेमा असल्याचं म्हटलंय. 

Continues below advertisement

काय म्हणाल्या हेमा मालिनी?

हेमा मालिनी यांनी 'बटवारा 1947' पाहिल्यानंतर आपल्या एक्स अकाउंट वर पोस्ट शेअर करत सिनेमाचं भरभरून कौतुक केलं. त्या म्हणाल्या ' मी काल 'बटवारा 1947' हा सिनेमा पाहिला.खरंच हा सिनेमा खूप काही सांगून जातो. देशाला सध्या या गोष्टीची गरज आहे. एकमेकांबद्दलचा द्वेष, फूट पाडण्यापेक्षा प्रेमाची भावना, माणुसकी या सगळ्यांची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमातून एकतेचा आणि माणुसकीचा संदेश देण्याची प्रेरणा मिळेल' असं त्या म्हणाल्या.

त्यांनी सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचही कौतुक केलं. त्या म्हणाल्या, 'राजकुमार संतोषी यांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे . सनी देओल आणि शबाना आझमी यांचे अभिनयही जबरदस्त आहेत.चित्रपटातील करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. आमिर खान यांचेही अभिनंदन, कारण त्यांनी आजच्या काळाची गरज असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि कायम लक्षात राहणारा, संदेश देणारा चित्रपट निर्माण केला आहे.' असं हेमा मालिनी म्हणाल्या.

Continues below advertisement

 

'बटवारा 1947' चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

बटवारा या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला उत्तम व्यवसाय केला. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.75 कोटी, दुसऱ्या दिवशी 13.50 कोटींचं कलेक्शन केलं. तीन दिवसात या चित्रपटाने एकूण 26 कोटी रुपयांचं कलेक्शन केलेलं. चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा कमी असली तरी येत्या काही दिवसात हा चित्रपट आणखी कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या चित्रपटाचा निमित्ताने सनी देओल आणि प्रीती झिंटा यांची जोडी 8 वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर दिसली. भैय्याजी सुपरहिट या चित्रपटात ते एकत्र दिसले होते.