Sonakshi Sinha Heeramandi :  दिग्दर्शक संजय लीला भन्साळीची (Sanjay Leela Bhansali) वेब सीरिज 'हिरामंडी' (Heeramandi) सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये कलाकारांची मांदियाळी झळकली आहे. या वेब सीरिजमधील कलाकारांचा अभिनय, कंटेटसोबत त्यांच्या इंटिमेट सीनचीदेखील चर्चा सुरू आहे. एक मे पासून 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज लाँच झाली आहे.आता या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान घडलेले अनेक किस्से कलाकार सांगत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत चित्रित करण्यात आलेल्या इंटिमेंट सीनबद्दल अभिनेता इंद्रेश मलिकने एक मजेदार किस्सा सांगितला आहे. 


सोनाक्षीच्या आईसमोर इंटिमेट सीन....


इंद्रेश मलिकने 'हिरामंडी'त क्वीअरची (Queer) व्यक्तीरेखा साकारली आहे. वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत त्याचे अनेक सीन आहेत. सोनाक्षी सोबत इंटिमेट सीन करताना तिची आई पूनम सिन्हादेखील सेटवर उपस्थित होती. त्यावेळी मी घाबरलो होतो,असे इंद्रेश मलिकने सांगितले. इंद्रेशने 'बॉलिवूड नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एका सीनमध्ये सोनाक्षीला माझे डोके तिला पायांनी धरायचे होते. त्यावेळी तिची आई पूनम सिन्हादेखील सेटवर होती. त्यामुळे मला थोडं अवघडल्यासारखं झाले. त्यानंतर मला सोनाक्षीने थोडं कम्फर्टेबल केले आणि चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. जे करायचे आहे ते मी करेल असे सोनाक्षीने सांगितले. त्यानंतर त्या सीनचे शूटिंग पार पाडले.






पुरुषासोबत इंटिमेट सीन... 






इंद्रेशने या वेब सीरिजमध्ये पुरुषासोबतही इंटिमेट सीन दिले आहेत. इंद्रेशने अभिनेता  जेसन शाहसोबत इंटिमेट सीन दिला आहे. इंद्रेशने याबद्दल बोलताना सांगितले की, जेसनसोबतच्या सीनला जास्त रिटेक घेण्याची गरज भासली नाही. संजय लीला भन्साळी यांना मनासारखा शॉट मिळत नाही तोपर्यंत ते रिटेक करत असतात. मात्र, या सीनमध्ये फार रिटेक घेण्यात आले नाही. मात्र, जेसनसोबतच्या समलिंगी इंटिमेट सीनच्या वेळी पुरुषाच्या जवळ जायचे असल्याने थोडा दडपणाखाली होतो असेही इंद्रेशने सांगितले. या सीनबाबत मी आणि जेसनने शूटिंगच्या एक तास आधी चर्चा केली होती.