Hawahawai Movie Song Out : 'तू न झुकणारी, तू गं लढणारी, नारी तू लई लई भारी' असे दमदार शब्द असलेलं 'तू जा गं पुढं मर्दानी'  (Tu Ja Ga Pudha Mardani) हे बहुचर्चित 'हवाहवाई' (HawaHawai 2) चित्रपटातलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. गायिका उर्मिला धनगरच्या आवाजातलं हे गाणं प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ‘हवाहवाई’ (Hawahawai) हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. महेश टिळेकर यांनीच लिहिलेलं हे गाणं पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. आतापर्यंत उत्तमोत्तम आणि हिट गाणी गायलेल्या उर्मिला धनगरनं हे गाणं गायलं आहे.


या गाण्याविषयी लेखक, गीतकार दिग्दर्शक महेश टिळेकर म्हणाले, गायिका उर्मिला धनगरनं तिच्या आवाजाद्वारे या गाण्याचं सोनं केलं आहे. अतिशय दमदार असलेलं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.


पाहा गाणे :



मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री निमिषा संजयन हवाहवाईद्वारे मराठीत पदार्पण करत आहे. तिच्यासह वर्षा उसगावकर, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत.


साऊथ क्वीनचं मराठीत पदार्पण!


‘हवाहवाई’ या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्यानं निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं, असं  महेश टिळेकर यांनी सांगितलं. साऊथचे चित्रपट इतर भाषेत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत असताना, साऊथ मधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून सुरू केला आहे. अनेक नवीन कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.


निमिषाच्या चित्रपटांचे कौतुक


‘द ग्रेट इंडियन किचन’ या चित्रपटासह निमिषाच्या ‘नायट्टू’, ‘मालिक’ या चित्रपटांतील अभिनयाचं देखील  कौतुक झालं आहे. वेगळे विषय आणि कलाकारांच्या सहज अभिनयामुळे मल्याळम चित्रपटांचा देशात आणि परदेशातही प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. निमिषाचा बहुचर्चित 'द ग्रेट इंडियन किचन" हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनीही आवर्जून पाहिलेला आहे.


आशा भोसलेंच्या आवाजातील गाणं!


ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी 88व्या वर्षी ‘हवाहवाई’ चित्रपटातील एक गाणं गायलं आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आता निमिषा सजयनसारखी सशक्त अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत असल्यानं या चित्रपटाविषयीचं कुतुहल आणखी वाढलं आहे. मात्र, त्यासाठी प्रेक्षकांना 11 एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे.


हेही वाचा :


वयाच्या 88व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं 'हवाहवाई' चित्रपटासाठी गाणं!


Nimisha Sajayan : 'द ग्रेट इंडियन किचन'  फेम निमिषा सजयनची मराठीत एण्ट्री, ‘हवाहवाई’त दाखवणार अभिनयाचा जलवा!