Harsha Richhariya Sanyas Story: प्रयागराज महाकुंभ मेळा 2025 (Prayagraj Maha Kumbh Mela 2025) मध्ये अनेकजण व्हायरल झालेले. त्यापैकी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली, इन्फ्लुएंसर, मॉडेल हर्षा रिछारिया (Influencer, Model Harsha Richaria) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय. 32 वर्षांच्या सुप्रसिद्ध मॉडल असलेल्या हर्षा रिछारिया (Harsha Richaria) हिनं स्वत:च स्वतःचं पिंडदान केलंय. तसेच, त्यानंतर हर्षा रिछारियानं संन्यासाची दीक्षा घेतल्याचीही माहिती मिळतेय. जी नाती गरजेला कामी येत नाहीत. त्या नात्यांचं पिंडदान करण्यात कसलं दु:ख, अशी प्रतिक्रिया हर्षा रिछारियानं दिली आहे. सुप्रसिद्ध मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर असलेल्या हर्षा रिछारियानं मध्य प्रदेशातील उज्जैन इथं गुरुंच्या उपस्थित स्वत:चं पिंडदान करत संन्यास घेतला.
इन्फ्लुएंसर, मॉडेल हर्षा रिछारिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करत संन्यास स्वीकारला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील मंगलनाथ परिसरातील गंगाघाटावर असलेल्या मौनी तीर्थ आश्रमात, पंचायती निरंजनी आखाड्याचे पीठाधीश्वर सुमनानंद गिरी महाराज यांच्या हस्ते विधीपूर्वक दीक्षा घेऊन 19 एप्रिल 2026 रोजी ती साध्वी झाली. सोशल मीडियावर तिनं याला आपल्या नव्या जीवनाची सुरुवात असं संबोधलं आहे.
संन्यास परंपरेनुसार दीक्षा घेतल्यानंतर तिला 'हर्षानंद गिरी' हे नवं नाव देण्यात आलंय. या प्रक्रियेत तिनं शिखा आणि दंडाचा त्याग केला. तसेच, पितरांचं पिंडदान-तर्पण करत स्वतःचाही पिंडदान विधी पार पाडला, जो संन्यास स्वीकारताना महत्त्वाचा मानला जातो. झांसीमध्ये जन्म झाल्यापासून ते उज्जैनमध्ये संन्यास घेईपर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरतोय.
हर्षा रिछारिया हिनं सन्यास घेतल्यानंतर म्हटलं की, "मी माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात केलीय. गेल्या दीड वर्षांपासून मी या मार्गावर पुढे चालली होते. माझ्या या निर्णयाला अनेकांना विरोध केला. खुप काही घडलं. त्यावेळी असंही वाटलं की, या मार्गाला सोडुयात... कारण ज्यांच्यासाठी मी हे करत होते, त्यांनीच साथ सोडली. मग कोणासाठी तसं राहायचं. पण, नंतर माझा विचार बदलला. कारण या मार्गावर एकदा आलं की, पुन्हा ते कोणी सोडू शकणार नाही..."
हर्षा रिछारियाचा जन्म कुठे झालेला?
मीडिया रिपोर्टनुसार, हर्षा रिछारियाचा जन्म 26 मार्च 1994 रोजी उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंड क्षेत्रातील झाशी जिल्ह्यातील मऊरानीपूरमध्ये झालेला. त्यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब मध्य प्रेदशातल्या भोपाळमध्ये आलं आणि तिथेच स्थायिक झालं. सध्या हर्षा उत्तराखंडमध्ये राहाते.
संन्यास घेण्यापूर्वीच्या नववधू साजानं वेधलं लक्ष
संन्यास घेण्यापूर्वी हर्षा रिछारियाच्या सोशल मीडियावरची एक पोस्ट तुफान व्हायरल झालेली. चार दिवसांपूर्वीच्या या पोस्टमध्ये हर्षा नववधू साजात दिसलेली. तिनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं की, केवळ #harsharichhariya #wedding #trending #trendingreels #indianbride यांसारख्या हॅशटॅग्सचा तिनं वापर केलेला. याव्यतिरिक्त 7 एप्रिलची एका पोस्टमध्ये ती हळदीच्या लूकमध्ये दिसलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
