Asha Bhosle Ashes Immersion In Varanasi Ganga: सूरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle) यांचं निधन झालं आणि संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. 12 एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसलेंच्या निधनानंतर संपू्र्ण देशाला धक्का बसला. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी 13 एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. एक आठवडा पूर्ण झाल्यावर, 20 एप्रिल रोजी आनंद भोसले आणि त्यांची नात जनाई भोसले यांनी वाराणसीमध्ये आशा भोसलेंच्या अस्थींचे विसर्जन केले. अस्थी विसर्जनाचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आशा भोसले यांची नात जनाई भोसले खूप भावुक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
आशा भोसलेंच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित (Legendary singer Asha Bhosle passes away)
आशा भोसलेंच्या कुटुंबाने त्यांच्या अस्थींचे विसर्जन वाराणसीतील गंगा नदीत केले. पारंपारिक विधींसह त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी आशा भोसले यांची नात जनाई भोसले खूप भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं. तिला आजीच्या निधनानंतर खूप मोठा धक्का बसला. आपल्या आजीच्या अंतिम यात्रेवेळी जनाई खूप भावुक झाली होती. ती ढसाढसा रडत होती. दरम्यान, अस्थी विसर्जनाच्या वेळीही जनाई भावुक झालेली दिसली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
आशा भोसलेंच्या निधनानंतर नात जनाई भावुक (Zanai Bhosle emotional video during asthi visarjan)
आशा भोसलेंच्या निधनानंतर, जनाईने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर करत, महान गायिकेबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले. 'आज सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मी माझी सर्वात चांगली मैत्रीण , चांगली सोबतीण गमावली आहे. माझ्या जन्मानंतर त्यांनीच मला आपल्या मिठीत घेतलं. आता मी सकाळी कुणाला मिठी मारणार? कुणासोबत चहा पिणार? माझी वाट कोण पाहणार? कुणासोबत मी मनमोकळ्या गप्पा मारणार? ती वरुन कुटुंबावर लक्ष ठेवून आहे. मला विश्वास आहे की ती माझ्याकडे परत येईल..', असं जनाईने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
