Hardeek Joshi : अभिनेता हार्दिक जोशीच्या (Hardeek Joshi) वहिनीचं मागील वर्षी निधन झालं. तिच्याच आठवणीत अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हार्दिक आणि त्याच्या वहिनीचं जवळचं नातं होतं, हे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन लक्षात येतच. तसेच त्याची पत्नी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हिने देखील वहिनीच्या आठवणीत पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं होतं.
हार्दीक जोशी हा झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेनेच त्याचा तुफान प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्याचप्रमाणे याच मालिकेमुळे तो घराघरांत पोहचला. त्यानंतर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत हार्दिक झळकला होता. दरम्यान जाऊ बाई गावात या कार्यक्रमाचं श्रेयही हार्दिकने त्याच्या वहिनीला दिलं होतं.
हार्दिकची पोस्ट काय?
हार्दिकने त्याच्या सोशल मीडियावर वहिनीसोबतचा फोटो शेअर करताना म्हटलं की, आज 24 नोव्हेंबर तुला जाऊन एक वर्ष पुर्ण झालं पण आजही तुझी उणीव सतत जाणवते आणि ती कायम जाणवत राहणार, तुझ्या गोड आठवणी तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहेत आणि कायम आमच्या सोबत राहणार...
'कार्यक्रम पाहायला ती या जगातच नव्हती..'
हार्दिकने त्याच्या जाऊ बाई जोरात या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ,"माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि 'जाऊ बाई गावातचा' पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तिला नमस्कार करून करतो".