Sunny Leone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच तिच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. काही दिवसांपूर्वी तिची  'अनामिका' ही वेब सीरिज रिलीज झाली. या सारिजमध्ये अॅक्शन मोडमध्ये सनी दिसली. सनी लिओन करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. सनीला तीन मुले असून ती तिच्या पतीसोबत राहते. सनी अभिनय, नृत्य आणि शोजमधून करोडो रुपये कमावते. 


सनी लिओनीचं आलिशन घर 
सनी तिच्या करिअरसाठी परदेशातून भारतात आली होती. मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या एका आलिशान पेंट हाऊसमध्ये ती मुलांसोबत आणि पती डॅनियल वेबरसोबत राहते. तिचा लॉस एंजेलिसमध्येही सुंदर आणि आलिशान बंगला आहे.  सनीच्या बंगल्याचे नाव ड्रीम आहे.  बंगल्याची किंमत 19 कोटी रुपये आहे. 


सनीचं कार कलेक्शन 
सनी लिओनच्या कार कलेक्शनमध्ये  मॅसेराटी, क्वाट्रोपोर्ट, बीएमडब्ल्यू 7 सीरीज आणि ऑडी ए5 या गाड्यांचा समावेश आहे. 


अभिनेत्री सनी लिओन ही एक अभिनेत्री असण्यासोबतच एक बिझनेस वुमन, फिटनेस इंस्पिरेशन आहे. सनीचा स्वत:चा एक कॉस्मॅटिक ब्रॅण्ड आहे. त्याशिवाय प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.  98 कोटी रुपयांची एकूण संपत्ती सनीकडे आहे. सनी एका वर्षात जवळपास 12 कोटींची कमाई करते. एका चित्रपटासाठी सनी 1.2 कोटींचे मानधन घेते. 


सनीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. इन्स्टाग्रामवर तिला जवळपास  49.5 मिलियन लोक फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी ‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक हे सनीच्या जीवनावर आधारित आहे. 


महत्वाच्या बातम्या :