Samantha Ruth Prabhu : ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज (28 एप्रिल) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ दक्षिणात्यचं नव्हे, तर बॉलिवूड विश्वातही संमथाने आपल्या अभिनयाच्या जोरावर हक्काचे स्थान निर्माण केले आहे. परंतु, अभिनेत्रीचा आजवरचा प्रवास इतका सोपा नव्हता. प्रचंड संघर्ष आणि मेहनत करून समंथा आज इथवर पोहोचली आहे. कधीकाळी दोन वेळच्या पोटभर अन्नापासूनही अभिनेत्री दूर होती.


साऊथ अभिनेता नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. या घटस्फोटानंतर अभिनेत्री बराच काळ ट्रोल झाली होती. मात्र, या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावर न होऊ देता, तिने सर्वांना कामातून याचे उत्तर दिले.


कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती...


समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी केरळमध्ये झाला. समंथाचं खरं नाव यशोदा असलं, तरी जग तिला समंथा म्हणून ओळखतं. समंथाची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तिच्या शिक्षणासाठीही कुटुंबाजवळ पैसे नव्हते. समंथाने छोटी-मोठी कामं करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. दिवसातून केवळ एकच वेळ अन्न खाऊन ती जगत होती. यानंतर तिने केवळ अर्थार्जनाचं साधन म्हणून मॉडेलिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला.


पहिली संधी मिळाली अन्...


दक्षिणात्य चित्रपट निर्माते रवि वर्मन यांनी समंथाला पहिल्यांदा अभिनयाची संधी दिली. मॉडेलिंग करत असतानाच रवि वर्मन यांनी समंथाला चित्रपट ऑफर केला. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 2010मध्ये ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात अभिनेता नागा चैतन्य तिच्यासोबत झळकला होता. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आणि समंथाची इंडस्ट्रीत खूप चर्चा झाली. तेव्हापासून अभिनेत्रीने तामिळ, तेलगू, हिंदी भाषेतील सुमारे 65हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.


कोट्यवधींची मालकीण


‘साऊथ क्वीन’ समंथा रुथ प्रभू सध्याच्या घडीला 11 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 80 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, सामंथा फॅशन लेबल ‘साकी’ आणि ‘प्री-स्कूल एकम’मधून देखील कमाई करते.


हेही वाचा :