Haluvar Paule Music Video : "हळुवार पाऊले वेचित साजरी किनारी आली, रुणझुणता पैंजण नाद बासरीत गुंफून गेली", अशा हळुवार ओळी असलेला नवाकोरा म्युझिक व्हिडीओ सप्तसूर म्युझिक या युट्यूब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे. हरीश वांगीकरनं या म्युझिक व्हिडीओच्या निर्मितीसह संगीत आणि गायनाची जबाबदारी देखील उत्तमरीत्या पार पाडली आहे.


नव्या दमाच्या कलावंतांना संधी देणाऱ्या सप्तसूर म्युझिकने ‘हळुवार पाऊले’ हा म्युझिक व्हिडीओ प्रस्तुत केला आहे. अनिकेत जंगम यांनी या गाण्याचं लेखन केलं आहे, तर सचिन अंबट यांनी म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे.


पाहा गाणं



पेशाने वकील असणाऱ्या अनुजा चौधरीसह एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत असलेला हरीश वांगीकर या म्युझिक व्हिडीओमध्ये चमकला आहे. हरीशनं आतापर्यंत गायक, संगीतकार, अभिनेता म्हणून या पूर्वी काही म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे, तर अनुजानं ‘असेही एकदा व्हावे’ हा चित्रपट, ‘शौर्य’, ‘कुसुम’ अशा काही मालिका केल्या आहेत.


‘हळूवार पाऊले’ हे एक प्रेमगीत आहे. कोकणातल्या नितांत सुंदर परिसरात या म्युझिक व्हिडीओचं नेत्र सुखद चित्रीकरण करण्यात आलं आहे. तर, हलक्याफुलक्या शब्दांना तितकंच श्रवणीय संगीत ही या म्युझिक व्हिडीओची खासियत आहे. अनुजा आणि हरीश या जोडीच्या म्युझिक व्हिडीओतील सफाईदार वावरानं या गाण्याला चार चाँद लावले आहेत. प्रेमाची हळुवार भावना या गाण्यातून अप्रतिम पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा म्युझिक व्हिडीओ आवडेल यात शंकाच नाही.


हेही वाचा :


Sher Shivraj : भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘शेर शिवराज'चा डंका, मराठी चित्रपटाचे शो जगभरात ‘हाऊसफुल’!


Happy Birthday Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...


Irsal : 'इर्सल'मध्ये दिसणार माधुरी पवारच्या नखरेल अदा, 'या बया दाजी आलं' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!