Hai Jawani Toh Ishq Hona Hai: वरुण धवन (Varun Dhavan), मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आणि पुजा हेगडे (Pooja hegde) अभिनीत 'है जवानी तो इश्क होना है'(Hai Jawani Toh Ishq Hona Hai) या सिनेमाची (Entertainment) प्रदर्शनापूर्वीपासून प्रचंड चर्चा होती. हा सिनेमा आज  शुक्रवार, 4 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.  सिनेमाच्या ट्रेलरपासून ते   गाण्यांपर्यंत, या चित्रपटाने आधीच बरीच चर्चा निर्माण केली होती. दरम्यान, या रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटाला एक दमदार ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. चला तर मग जाणून घेऊयात, 'है जवानी तो इश्क होना है' हा चित्रपट किती कोटींची ओपनिंग करु शकतो.

Continues below advertisement

पाच वर्षांनंतर डेव्हिड धवन आणि वरुण धवन पुन्हा एकत्र (David Dhawan and Varun Dhawan reunion)

तब्बल 5 वर्षांनंतर 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमानिमित्त   डेव्हिड धवन आणि मुलगा वरुण धवन पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.   त्यांचा यापूर्वीचा सिनेमा  'कुली नंबर 1' थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. त्यांचा शेवटचा 'जुडवा 2' हा सिनेमा 2017 साली सिनेमागृहात रिलीज झाला होता.   यापूर्वी त्यांची फिल्म 'मैं तेरा हिरो' हा सिनेमा 2014 साली सुपरहिट झाला होता.   वडील - मुलगा या जोडीची प्रभावी कामगिरी पाहता, 'है जवानी तो इश्क होना है'  हा  सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

'है जवानी तो इश्क होना है'साठी किती कोटींचे अॅडव्हान्स बुकींग झाले? (Varun Dhawan new movie advance booking)

'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल सांगायचं झाल्यास, या चित्रपटाने प्री- तिकिट विक्रीतून 1 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. शिवाय, या शुक्रवारी कोणताही मोठा  हिंदी सिनेमा प्रदर्शित होत नाहीये, जो बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा निर्माण करु शकेल. दरम्यान, ही कॉमेडी फिल्म पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या  आवडीचा ठरेल, अशी अपेक्षा आहे. 

Continues below advertisement

'है जवानी तो इश्क होना है' किती कोटींची ओपनिंग करु शकेल? (Mrunal Thakur and Pooja Hegde)

पहिल्याच दिवशी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 6 ते 9 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करण्याचे टार्गेट ठेवले आहे. जर या सिनेमानं पहिल्या दिवशी इतक्या कोटींची कमाई केली तर, हा सिनेमा  या वर्षाचा  सहावा सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरेल.  

2026मधील बॉलिवूडचे टॉप ओपनर्स फिल्म

धुरंधर 2 -  145 कोटीबॉर्डर 2 - 32.1 कोटीभूत बांग्ला - 18.31 कोटीओ'रोमियो- 9.01 कोटीइक्कीस- 7.28 कोटीपति पत्नी और वो दो - 4.38 कोटी

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?