Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सुरुवातीच्या दिवसापासून बरेच मोठे खुलासे करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकतच गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीच  एसटी आंदोलन केलं असल्याचं म्हटलं आहे. त्यातच आता खंडाळा घाटत त्यांचा एन्काऊंटर होणार होता, असा मोठा खुलासाही त्यांनी केलाय. 


बिग बॉस हिंदीच्या 18 व्या पर्वात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एन्ट्री घेतलीये. गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसमधील एन्ट्री विशेष गाजली कारण बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याच्या एक दिवस आधीच त्यांना धमकी आल्याची बातमी समोर आली होती. इतकच नव्हे दाऊदकडून आणि कराचीमधून ही धमकी आल्याचंही गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात सांगितलं आहे. तसेच शरद पवारांच्या घरावर झालेल्या दगडफेकीनंतरचा एक खुलासा केला आहे. 


गुणरत्न सदावर्ते यांनी काय म्हटलं?


बिग बॉसच्या घरात सदावर्ते यांनी म्हटलं की, 'शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला त्यामध्ये मला मास्टरमाईंट ठरवण्यात आलं होतं. त्या प्रकरणात  तीर्थयात्रेप्रमाणेच माझी जेलयात्रा झाली होती. जर त्या दिवशी मला जामीन मिळाल नसता तर माझा एन्काऊंटर नक्की होता. कारण त्या पोलीस अधिकाऱ्यालाच मी नको होतो. तो आयपीएस अधिकारी होता आणि माझ्यावर त्याचा राग होता. पण जेलमध्ये एक डॉक्टर होता, जो आरएसएसचा होता. मी त्याला सांगितलं की, सर जर मी इथून बाहेर पडलो तर हे लोक मला मारुन टाकतील... दुपारी अडीच वाजता माझ्या प्रकरणावर सुनावणी होईल, तुम्ही फक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान 4 पर्यंत तरी मला इथून सोडू नका.. मला सलाईन लावून ठेवा, एवढच माझ्यासाठी करा... त्यावेळी फक्त मी, अर्णव आणि कंगना आम्ही तिघच त्या सरकारविरोधात लढत होतो. कोर्टाने विचारलं की, ते पोलिसांच्या ताब्यात आहेत का? तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, नाही ते रुग्णालयात आहेत... तेव्हा कोर्टाने माझा अटकपूर्व जामीन मंजूर केला..'


पुढे त्यांनी म्हटलं की,  'तो जामीन झाल्यानंतर तो डॉक्टर म्हणाला की मी आताच पाहिलं, तुम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झालाय.. मी आता तुमची सलाईन काढतो आणि तुम्हाला अंडा सेलमध्ये शिफ्ट करतो. कसाबनंतर अंडा सेलमध्ये जाणारा मी होता. त्यानंतर माझ्या मुलीने पेनाने अर्ज लिहिला, माझ्या वडिलांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला.. तो तिने फोनवरुन तात्काळ देशाच्या गृहमंत्र्यांना अर्ज पाठवला.. त्यानंतर मला सोडण्यात आलं.. काही दिवसानंतर मी माझा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्थानकात गेलो होतो.. तिथे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. त्यांनी मला सांगितलं की, तुम्हाला जीवदान मिळालं आहे...मी विचारलं की, कसं काय? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, जर त्या दिवशी तुम्हाला आम्ही अटक केली असती तर खंडाळ्याच्या घाटात तुमचा एन्काऊंटर करणार होतो.. त्यानंतर सरकार बदललं आणि माझे दिवसही बदलले...' 






ही बातमी वाचा : 


 National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!