Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या (Bigg Boss ) घरात गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) एन्ट्री घेतली. त्यानंतर सध्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्ते यांचीच चर्चा सुरु आहे. अगदी पहिल्या दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांच्या वागणुकीचं घरातल्या इतर स्पर्धकांनाही आश्चर्य वाटत आहे. त्यांची राहण्यासाची अनोखी शैली, बोलण्याची स्टाईल या सगळ्यावर घरातले इतर स्पर्धकही व्यक्त होताना दिसत आहेत.
दरम्यान बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये गुणरत्न सदावर्ते हे घरातल्या स्पर्धकांच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. पण यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनीही उत्तर देत टास्कमध्ये गोंधळ घातल्याचं पाहायला मिळतंय.
नॉमिनेशन टास्कमध्ये काय झालं?
नुकताच नॉमिनेशन टास्कचा प्रोमो कलर्स टिव्हीवर शेअर करण्यात आला आहे. या टास्कमध्ये करण मेहराने गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं आहे. नॉमिनेट करताना करण म्हणतो की, हे खेळ खेळताना दिसत नाहीयेत. जास्त वेळ तर झोपूनच असतात. त्यावर उत्तर देत गुणरत्न सदावर्ते म्हणतात की, याचं नाव काय आहे? यांना मी जास्त पाहिलेलं नाही... तेव्हा तुमचंही नाव मला माहित नसल्याचं करण म्हणतो..
पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणतात की, नाही माहित तर ठीक आहे... आता तुम्हाला डंके की चोट पर बोलतोय.. त्यावर करण म्हणतो की, तुम्हाला दाखवतोच डंके की चोट पर काय असतं ते... त्यामुळे घरातील पहिल्याच टास्कदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी राडा घातला असल्याचं पाहायला मिळतंय...
बिग बॉसच्या घरात येण्याआधी दाऊदच्या धमकीचे फोन!
बिग बॉसच्या घरात येण्याआधी आपल्याला धमकीचे फोन आले होते. ते दुसरे तिसरे कोणाचे नाही तर दाऊदचेच असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. हे धमकीचे फोन कराची होऊन आल्याचेही त्यांनी सांगितलं. आपण त्याच्या विरोधात काही केस लढत असल्याने हे फोन येत असल्याचेही सदावर्ते यांनी सांगितलं. आता त्यांच्या या धक्कादायक खुलाशांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता बळवली आहे.