वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील ही जोडी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. या जोडीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एबीपी माझाशी खास बातचित केली. यावेळी या जोडीने त्यांच्या प्रेमकहाणीतील अनोखे किस्से सांगितले. विशेष म्हणजे या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दलही माहिती दिली. त्यांच्या या अनोख्य लग्नाला तेव्हा चांगलाच विरोध झाला होता, अशी माहिती जयश्री पाटील यांनी दिली.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा किस्सा नेमका काय आहे?
मला आधीपासूनच कायद्याच्या कचाट्यात अडकायला आवडत नाही. माझ्यामुळे इतरांना, माझ्या घरच्यांना किंवा यांना (गुणरत्न सदावर्ते) त्रास होईल, असं मला नको होतं. आमचं लग्न झालं अन् कदाचित आमचं पटलं नाही, तर घटस्फोट घेण्यासाठी दहा ते पंधरा वर्षे घालायचे का? असा मी विचार केला. त्यामुळे मी अगोदरपासूनच नियोजन केले. मी म्हटलं की आपण एका वर्षासाठी लग्न करून बघू. जमलं तर ठीक आहे नाही जमलं तर आपण आपल्या मार्गाने जाऊ. मात्र त्या लग्नाला खूप विरोध झाला. आमच्या लग्नाविरोधात मोर्चे निघाले, निषेध करण्यात आला. भयंकर अशा गोष्टी झाल्या.
मी गुणरत्न सदावर्तेंवर खूप प्रेम करते- जयश्री पाटील
माझा गुणरत्न हा लाख गुणरत्नची बरोबरी करतो. मी तर म्हणते की त्यांच्यासारखे कोणीही नाही. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते, अशी पुष्टीही जयश्री पाटील यांनी जोडली नाही.
आम्ही पाच वर्षे एकमेकांना डेट केलं- गुणरत्न सदावर्ते
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या एका वर्षात तुम्ही जयश्री पाटील यांच्यावर काय जादू केली, असं गुणरत्न सदावर्ते यांन विचारण्यात आलं. यावर बोलताना, ठरवून केलेल्या गोष्टी टिकत नाहीत. एक वर्ष म्हणूनच नाही तर त्याआधी पाच ते सहा वर्षे आम्ही फिरायला गेलो. सोबत अनेक ठिकाणी प्रवास केला. अनेक शहरांत सोबत प्रवास केला. आम्ही एकमेकांना डेट केलं, असंही तुम्ही म्हणून शकता, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
हेही वाचा :