Dawood Merchant Dies After Heart Attack: प्रसिद्ध लोकप्रिय गायक गुलशन कुमार यांची ओळख 'कॅसेट किंग' म्हणून होती. त्यांनी गायलेली गाणी आजही अजरामर आहेत. तसेच त्यांची भजने रसिकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. मात्र, 28 कॅसेट किंगचा आवाज कायमचा थांबला. गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आली.  या प्रकरणानंतर कारवाई, चौकशी झाली.  गुलशान कुमार हत्या प्रकरणात अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चेंटला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं.  त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  दरम्यान, गुरूवारी त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे आरोपीचे निधन झाले.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अब्दुल रौफ उर्फ ​​दाऊद मर्चंट याची प्रकृती प्रचंड खालावली होती. काही दिवसांपूर्वी त्याला ह्रदयविकाराचा झटका आला होता. प्रकृती नाजूक झाल्यानंतर ​​दाऊद मर्चंटला रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.  अबु सालेमच्या सांगण्यावरून गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या ​​दाऊद मर्चंटने 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ​​दाऊद मर्चंटला 30 डिसेंबर 2025 रोजी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्याची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्याला तातडीने  शहरातील सरकारी रूग्णालयात नेण्यात आलं.  3 जानेवारीपर्यंत त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.  4 जानेवारीपर्यंत त्याला रूग्णालायतून डिस्चार्च देण्यात आला.  परंतु,  गुरूवारी त्याला अस्वस्थ वाटू लागलं.  अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. यातच त्याचं निधन झालं.  गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपीच्या  निधनानंतर अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

गुलशान कुमार यांची हत्या नेमकी कशी झाली?

12 ऑगस्ट 1997 रोजी गुलशान कुमार यांच्या हत्येची घटना उघडकीस आली.  साऊथ अंधेरी येथील जीतेश्वर मंदिराबाहेर गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यादिवशी गुलशन कुमार बॉडीगार्डशिवाय मंदिरात पुजेसाठी गेले होते.  त्याचवेळी हल्लेखोरांनी डाव साधला.  तीन हल्लेखोरांनी मिळून गुलशन कुमार यांच्यावर 16 राऊंड फायरिंग केली.  हा हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच ड्रायव्हरही गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं.  मात्र, वाटतच त्यांनी प्राण सोडले.