Darshan Kumar Passes Away: मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी  समोर येत आहे. टी - सीरिजचे फाउंडर  दिवंगत गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचे लहान बंधू दर्शन कुमार (Darshan Kumar) यांचं निधन झालं आहे. 18 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे.  माहितीनुसार, 70 व्या वर्षी दर्शन कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत जगतावर  शोककळा पसरली आहे. गायक मिका सिंह याने दर्शन कुमार यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.  मिका सिंह याने इन्स्टाग्रामवर  एक पोस्ट शेअर करुन दर्शन कुमार यांना श्रध्दांजली वाहिली आहे.  पंजाबी आणि प्रादेशिक संगीतासाठी दर्शन कुमार यांचे खूप मोठे योगदान मानले जाते. दर्शन कुमार यांच्या निधनानंतर म्युझिक इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.  

Continues below advertisement

गुलशन कुमार यांच्या लहान बंधुंचे निधन (Darshan Kumar brother of Gulshan Kumar Death News)

मिका सिंहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर मिका सिंहने लिहिले की, 'टी - सीरीजचे मालक दर्शन कुमार यांचे निधन झाल्याची ह्रदयद्रावक बातमी नुकतीच मिळाली. आपल्यामागे ते सुंदर आठवणी सोडून गेल्या आहेत.  ते एक महान आणि नेहमी मदत करणारे व्यक्ती होते. त्यांनी अनेक गायकांना पाठिंबा दिला आहे, तसेच संधी दिली आहे.  त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती..',  अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे. 

गुलशन कुमार यांचे पुत्र भूषण कुमार हे टी- सिरीजचे चेअरमॅन आहेत. दर्शन कुमार हे कंपनीचे चेअरमॅन तसेच व्यवस्थापकीय संचालक होते.  दर्शन कुमार यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही.  दरम्यान, दर्शन कुमार यांच्या निधनानंतर  मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.  त्यांच्यावर सिनेसृ्ष्टीतील कलाकारांनी श्रध्दांजली वाहिली आहे.   

Continues below advertisement

टी सिरीजची स्थापना कुणी केली?

 

टी - सिरीज हे भारतातील सर्वात मोठे संगीत रेकॉर्ड लेबल आणि निर्मिती कंपनी आहे.  या कंपनीची स्थापना 1983 साली झाली होती. गुलशन कुमार यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भूषण कुमार यांनी ही कंपनी सांभाळली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला