Govinda Set for Big-Screen: 'हिरो नंबर 1' म्हणून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटलणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. गेल्या काही वर्षांपासून अभिनेता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.   त्याची पत्नी सुनीता अहुजा हिनं गोविंदावर अनेक आरोप केले होते. पण आता गोविंदा आपल्या वैयक्तिक कारणामुळे नसून,  प्रोफेशनल कारणामुळे चर्चेत आला आहे. तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा लवकरच 'रुपा' चित्रपटात झळकणार आहे.  या चित्रपट तो नवोदित कलाकारासोबत झळकणार असल्याची माहिती आहे.  दरम्यान,  या चित्रपटाची निर्मिती तो स्व:त करणार असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

तब्बल 7 वर्षांनंतर मुख्य नायक म्हणून गोविंदाचं कमबॅक (Hero No. 1 Govinda Returns as Lead Actor)

गोविंदा 2019 साली प्रदर्शित झालेल्या  'रंगीला राजा' या सिनेमात झळकला होता. या सिनेमात त्याने दुहेरी भूमिका साकारली होती. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा यशस्वी ठरला नाही. तर, 2022 साली अभिनेता 'नाम था कन्हैयालाल' या डॉक्यूमेंट्रीमध्येही दिसला होता. दरम्यान, मागच्या 7 वर्षांपासून त्याचा एकही सिनेमा चालला नाही.  गेल्या 7 वर्षांपासून तो मोठ्या पडद्यापासून दूर होता.  पण आता पुन्हा नव्या जोमात सिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यास सज्ज झाला आहे.

या शिवाय गोविंदाने अलिकडेच  'फ्रायडे', 'आ गया हीरो', 'हे ब्रो', 'हॅपी एंडिंग', 'किल दिल', 'दीवाना मैं दीवाना', 'दिल्ली सफारी' यांसारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान, 'रूपा' या सिनेमाचा दिग्दर्शक नेमका कोण असणार?   या सिनेमातून कोणती नवी स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस येणार? गोविंदाचं या सिनेमातून कमबॅक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

'रुपा' या चित्रपटाबाबतीत गोविंदा म्हणाला?

प्रेस कॉन्फरेन्समध्ये 'रुपा' या सिनेमाबाबत गोविंदा म्हणाला, 'आता मी तयार आहे. लवकरच तुम्हाला 'रुपा' सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल माहिती मिळेल. मला असं वाटतं की हा थोड्या हटक्या प्रकाराचा सिनेमा असणार आहे. विशेषत: तरुणांसाठी हा खास सिनेमा असणार आहे.  मी सिनेमात काम करतो. तेव्हा लोकांना आश्चर्य वाटतं, की इथे कसा? मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. मी कायम सत्य सांगत आलो आहे. पण लोकांना यावर विश्वास बसत नाही', असं गोविंदा म्हणाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

काळ्या लेहेंग्यात जान्हवी कपूरचा रॉयल लूक; 1.5 लाखांच्या डिझायनर आउटफिटने वेधलं लक्ष, PHOTOs