Govinda On Sunita Ahuja Comment: गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) हे कपल सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा आपली को-स्टार कोमल रानी स्वर्णकारसोबत (komal rani) स्पॉट झाला होता. यानंतर पत्नी सुनीताने गोविंदावर टीकेचे तोफ डागली. तिने गोविंदाला कोमल रानीचा शुगर डॅडी असल्याचं म्हटलं. सोशल मीडियावर सुनीताची प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल झाली. आता गोविंदाची या प्रकरणावर प्रतिक्रिया (Entertainment) समोर आली आहे. गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून गोविंदाने सुनीताला प्रत्युत्तर दिले असल्याचं म्हटलं आहे. सध्या गोविंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गोविंदाने सुनीताला मर्यादित राहण्याचा सल्ला दिला (Govinda on Sunita Ahuja breaks silence on wife Sunitas remarks)
इन्स्टंट बॉलिवूडने गोविंदाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'सुनीता अहुजाच्या वक्तव्याला गोविंदाचे सडेतोड उत्तर' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये गोविंदा सुनिताला मर्यादेत राहण्याचा सल्ला देताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये गोविंदा म्हणतो की, 'देशातील सर्व मोठ्या अभिनेत्यांनी यंगस्टर्ससोबत काम केलं आहे. लोकांच्या मनातून माझे स्थान काढून घेण्यासाठी तुम्ही कोणतीही कसर सोडत नाही आहात'.
'देवाने मला प्रसिद्धी, आदर आणि संपत्ती दिली आहे. याचा अर्थ असा नाही की, ज्यांच्याकडे नाही, त्यांचा तुम्ही अपमान कराल. फक्त आपल्या मर्यादेत राहा', असं गोविंदा हात जोडून म्हणतो. हा व्हिडीओ सुनीताच्या व्हायरल व्हिडीओनंतर समोर आला आहे. हा व्हिडीओ vmj_bollywood या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओसोबत असाही दावा करण्यात आला आहे की, गोविंदाने अखेर सुनीताच्या आरोपांवर मौन सोडले आहे. गोविंदाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत गोविंदा म्हणतो की, 'सुनीताजी तुम्ही आई आणि बहिणींवरुन खूप शिव्या देऊ लागले आहात. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की, जर लोक तुमच्यापासून प्रेरित झाले तर, तुम्हाला स्वत:ला आरसा दिसेल. आपण ज्या पद्धतीने वागता, यंगस्टर्स देखील तुम्हाला फॉलो करतात. जर लोकांनी तुम्हाला आई - बहिणींवरुन शिव्या देण्यास सुरुवात केली तर, तर आम्हा सर्वांनाच लाज वाटेल. हे सर्व काही करु नका. तुम्ही आई - बहिणींचे नाव बदनाम केले आहे. तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते'. सध्या गोविंदाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
