Anurag Kashyap on Shubhra Shetty: फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच चित्रपट तयार केले. पण चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची सध्या बरीच चर्चा रंगली आहे. खरंतर, अनुराग यांचं दोन वेळा घटस्फोट झाला आहे. आता ते त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीसोबतच्या (Shubhra Shetty) नात्यामुळे चर्चेत आहे. आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीसोबतच्या प्रेम संबंधामुळे (Relationship) अनुराग यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता त्यांनी वयाच्या अंतरावर मौन सोडले आहे. या रिलेशनशिपच्या चर्चांवर (Entertainment) त्यांनी भाष्य केलं आहे.
अनुराग यांनी शुभ्रासोबतच्या नात्याबद्दल काय सांगितले? (Anurag Kashyap open up about relationship Breaks Silence On Shubhra Shetty)
शुभ्रा शेट्टी असे 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. अनुराग कश्यप आणि शुभ्रा हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. Janice Sequeira सोबत झालेल्या मुलाखतीत, अनुराग कश्यप यांनी रिलेशनशिपच्या चर्चांवर आणि वयावरुन होणाऱ्या टीकेबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. आपल्याहून 20 वर्षांनी लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, 'आमचं नातं, पुस्तकं, सिनेमा आणि सिनेमा महोत्सवांच्या माध्यमातून जुळलं. ती माझ्यापेक्षा जास्त फिल्म फेस्टिव्हल्सना जाते'
अनुराग यांनी यावेळेस नातं आणि वयाच्या अंतरावर भाष्य केलं आहे. 'आम्ही बऱ्याच कठीण प्रसंगाचा सामना केला आहे. मला लाज नाही वाटत. पण मला स्वत:बद्दल खूप संकोच वाटू लागतो. मी एका क्षणी इतकं कॉन्शियस फिल करत होतो की, की मी त्यांना (शुभ्राला) स्वत:पासून दूर करण्याचा प्रयत्न केला. तिचा चेहरा पाहिल्यानंतर तिच्या वय कळत नव्हते. मी वयाने मोठा होत गेलो, पण ती तशीच राहिली. त्यामुळे मला संकोट वाटू लागतो', असं अनुराग कश्यप म्हणाला.
लॉकडाऊनच्या काळात अनुराग यांना शुभ्राबद्दलच्या आपल्या प्रेमाची जाणीव झाली. यासंदर्भात ते म्हणाले, 'जरी आम्ही गेली 11 वर्षे एकत्र असलो तरी, 'निशांची'च्या शूटिंगच्या सेटवर मला या गोष्टीची जाणीव झाली. पण ही गोष्ट स्वीकारायला मला खूप वेळ लागला', असं अनुराग कश्यप म्हणाले. दरम्यान, दोघांचे नाते हे कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
