Goldie Behl and Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात त्यांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आज सोनालीने (Sonali Bendre)  याबाबत स्पष्टीकरण दिलं. ठाकरे कुटुंबाशी जुनं नातं आहे, जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही, असं सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आज बोलताना म्हणाली. (Goldie Behl and Sonali Bendre

दरम्यान, सध्या सोनाली बेंद्रे चर्चेत असली तरी गेली काही वर्ष तिच्यासाठी सोपी नव्हती. सोनालीला कॅन्सर सारखा जीवघेणा आजार झाला होता. या आजाराशी तिने धैर्याने झुंज दिली. दरम्यान, या काळात तिचा पती गोल्डी बहल तिच्या पाठीशी उभा राहिला. त्याने सोनाली बेंद्रेला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. तो आजारपणात सावलीप्रमाणे तिच्या पाठीशी उभा राहिला. (Goldie Behl and Sonali Bendre)

अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली बेंद्रे हिची वयाच्या 22 वर्षी निर्माता गोल्डी बेहल ह्यांच्याशी भेट झाली. गोल्डी हे ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश बेहल यांचे पुत्र आहेत, ज्यांनी कसमें वादे, जवानी, पुकार आणि अपने अपने यांसारखे चित्रपटांची निर्मिती केली. सोनाली आणि गोल्डी हे बॉलीवूडमधील सर्वात गोड आणि प्रेमळ जोडप्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी दाखवून दिलं की खरे प्रेम कोणत्याही नात्यापेक्षा अधिक मजबूत असतं. त्यांच्या लग्नाला कित्येक वर्षे झाली असली, तरी आजही त्यांचं नातं तसंच टिकून आहे.  (Goldie Behl and Sonali Bendre)

पहिली भेट आणि प्रेमाची सुरुवात

सोनाली आणि गोल्डी यांची पहिली भेट 'नाराज़' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. सोनालीच्या सौंदर्याने भारावून गेलेल्या गोल्डीसाठी, एक स्टार अभिनेत्री म्हणून तिला जवळ जाणं अशक्यच वाटत होतं. पण नशिबाने वेगळंच काही ठरवलं होतं — कारण सोनाली ही गोल्डीच्या बहिणीची जवळची मैत्रीण होती. एका मुलाखतीत गोल्डी म्हणतो, “मी सोनालीला ‘नाराज़’च्या सेटवर भेटलो. माझी बहीण श्रीष्टी आर्या तिची चांगली मैत्रीण होती, पण मी तिला ओळखत नव्हतो. ती खूपच आकर्षक वाटली. खरं सांगायचं तर मला तिचं संथ गतीने खाणं फार आवडलं. जेवताना मी यावर कमेंट केली, आणि ती थोडीशी चिडली. पण त्या निमित्ताने आमचं बोलणं सुरू झालं. आमचं पहिलं संभाषण जेवणावर होतं — आणि आजही बहुतेक वेळा आमचं बोलणं जेवणावरच होतं!” (Goldie Behl and Sonali Bendre)

मैत्रीचं रुपांतर प्रेमात

हे पहिलं संभाषण झाल्यानंतर ते दोघं चांगले मित्र झाले आणि वेळ मिळेल तसं भेटत असत. पुढे सोनालीने ‘अंगारे’ या चित्रपटात काम स्वीकारलं, ज्याचे निर्माता गोल्डी होते. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात गोल्डी सहाय्यक म्हणून काम करत होता, त्यामुळे त्यांना अधिक वेळ एकत्र घालवता आला. गोल्डी सांगतो, “त्या काळात आम्ही अधिक बोलू लागलो. हळूहळू आमची मैत्री घट्ट झाली.”  (Goldie Behl and Sonali Bendre)

सुरुवातीला हे प्रेम एकतर्फीच होतं , गोल्डी एकतर्फी प्रेमात होता. सोनाली सुरुवातीला नकार देत होती, पण गोल्डीने हार मानली नाही. तो म्हणतो, “माझ्या आईनेही मला तिला सोडू नकोस असं सांगितलं. ती सोनालीला खूप आवडत होती. मी पहिल्यांदाच आईचा सल्ला ऐकला आणि देवाचे आभार मानतो की ऐकला.”

अभिषेक बच्चनची मदत आणि प्रपोजल

प्रेमात पडल्यावर एके दिवशी गोल्डीने तिला प्रपोज करायचं ठरवलं. मात्र तो फारच घाबरलेला होता. मग त्यांच्या मित्र अभिषेक बच्चनने पार्टीचे निमित्त करत सगळं हसत-खेळत ठेवलं आणि गोल्डीची मदत केली. त्यावेळी सोनालीला गोल्डीने स्वप्नवतरीत्या प्रपोज केलं. सोनालीनेही आनंदाने होकार दिला.

आई-वडिलांचं मन जिंकलं

सोनालीच्या आई-वडिलांना हे नातं सुरुवातीला मंजूर नव्हतं. कारण गोल्डी वयाने लहान होता, अनुभवही कमी होता, शिक्षणातही तुलनेने कमी होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो महाराष्ट्रीयन नव्हता. पण त्याच्या प्रेमामुळे, संयमामुळे त्याने शेवटी सोनालीच्या आई-वडिलांची मने जिंकली.

थाटामाटात लग्न

सोनाली आणि गोल्डीने 12 नोव्हेंबर 2002 रोजी थाटात लग्न केलं. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. मनिषा कोइराला, अभिषेक बच्चन व कुटुंब, हृतिक रोशन आणि अनेक बड्या फिल्मस्टार्सनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांच्या आयुष्यात राणवीर या मुलाचा जन्म झाला. गोल्डी म्हणतो, “राणवीर ही सोनालीने मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. सोनाली एका सामान्य आईप्रमाणे प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष देते. शाळेच्या तयारीपासून त्याच्या मानसिक-शारीरिक वाढीपर्यंत. ती त्याला उत्तम आयुष्य देण्यासाठी नेहमी प्रयत्न करते.”

कर्करोगाशी लढा आणि गोल्डी खंबीरपणे पाठीशी उभा राहिला 

2018 मध्ये सोनालीला कर्करोग झाला, ही बातमी त्यांच्या आयुष्यात एक मोठा धक्का होता. ती लगेच लंडनला उपचारासाठी गेली. केमोथेरपी सुरू करण्यापूर्वी तिने केसही कापून टाकले. पण या संकटकाळात गोल्डी तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. सोनालीने त्याबद्दल म्हटलं, “गोल्डी माझ्यासाठी खंबीर आधारस्तंभ ठरला. देवाचे आभार मानते की मी त्याच्याशी लग्न केलं.”

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सोनाली बेंद्रेचे सलमान खानच्या स्वभावाबाबत मोठे खुलासे; 'हम साथ साथ हैं'च्या शूटींगवेळीचे किस्से सांगितले VIDEO

Sonali Bendre: 'राज ठाकरेंच्या पत्नीने मला फोन केला अन्...' सोनाली बेंद्रेने मायकल जॅक्सनचं स्वागत का केलं होतं? 29 वर्षांनंतर सांगितलं कारण